Megha Ghadge: 'लावणी क्वीन' मेघा घाडगेला नेमकं काय झालंय? अभिनेत्रीनं रुग्णालयातून केली पोस्ट...-marathi actress megha ghadge in hospital share video from hospital ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Megha Ghadge: 'लावणी क्वीन' मेघा घाडगेला नेमकं काय झालंय? अभिनेत्रीनं रुग्णालयातून केली पोस्ट...

Megha Ghadge: 'लावणी क्वीन' मेघा घाडगेला नेमकं काय झालंय? अभिनेत्रीनं रुग्णालयातून केली पोस्ट...

Dec 30, 2023 10:58 AM IST

Megha Ghadge In Hospital: अभिनेत्री मेघा घाडगे हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर करून आपल्या आजारपणाविषयी माहिती दिली आहे.

Megha Ghadge In Hospital
Megha Ghadge In Hospital

Megha Ghadge In Hospital: मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी लावणी क्वीन मेघा घाडगे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात आहे. 'बिग बॉस' फेम अभिनेत्री मेघा घाडगे सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती आपल्या आयुष्यातील सगळ्या घडामोडी सोशल मीडियावर शेअर करत असते. तिला रुग्णालयाच्या बेडवर पडलेलं पाहून चाहते काळजीत पडले होते. अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. अनेकांनी तिला कमेंट करून याबद्दल विचारले देखील होते. अखेर आता तिने स्वतः या आजारपणाचा खुलासा केला आहे.

अभिनेत्री मेघा घाडगे हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर करून आपल्या आजारपणाविषयी माहिती दिली आहे. स्वतःचा एक व्हिडीओ शेअर करून त्याला एक कॅप्शन दिले आहे. यात तिने म्हटले की, 'बुखार… ३१st येतोय... किंग करोना परत आलाय, प्लिज काळजी घ्या मित्रमैत्रिणींनो २०२४मध्ये तुम्हा सर्वांना निरोगी आणि सुख, समृद्धी, भर भरभरून यश मिळो ..!' या कॅप्शनसोबतच तिने हॅशटॅग्समध्ये 'व्हायरल फिवर' असे म्हटले आहे. याचाच अर्थ गेले काही दिवस मेघ घाडगे हिला तापाच्या साठीची लागण झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी भाड्यानं दिलं नवं ऑफिस; महिन्याचं भाडं ऐकून बसेल धक्का!

काही दिवसापूर्वीच अभिनेत्री मेघा घाडगे हिने तिचा वाढदिवस साजरा केला होता. यावेळी तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती हॉस्पिटलमध्येच केक कापताना दिसली होती. या फोटोंमध्ये अभिनेत्री मेघा घाडगे ही हॉस्पिटलच्या बेडवर आपला वाढदिवस साजरा करताना दिसली होती. हॉस्पिटलच्या बेडवरच तिने आपल्या वाढदिवसाचा केक कापला होता. अभिनेत्रीचं कुटुंब खास केक घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचलं होतं. मेघा घाडगे हिने आपल्या कुटुंबासोबतच केक कापून हा दिवस साजरा केला होता.

तिच्या वाढदिवसाचे फोटो बघून चाहते चांगलेच काळजीत पडले होते. अनेकांनी तिच्या या पोस्टवर कमेंट करून तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘बिग बॉस मराठी ४’मधून मेघा घाडगे घराघरांत पोहोचली होती. ती नेहमीच तिचे फोटो व व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. मेघाने आपल्या अप्रतिम नृत्यकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Whats_app_banner
विभाग