मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'आई-वडील वेगळे झाले तेव्हा मला आनंद झाला', क्षिती जोग पहिल्यांदाच पालकांच्या घटस्फोटावर बोलली

'आई-वडील वेगळे झाले तेव्हा मला आनंद झाला', क्षिती जोग पहिल्यांदाच पालकांच्या घटस्फोटावर बोलली

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 29, 2024 08:52 AM IST

अभिनेत्री क्षिती जोग हिच्या आई आणि वडील यांचा घटस्फोट झाला आहे. त्यावर तिने पहिल्यांदाच भावना व्यक्त केल्या आहेत. जाणून घेऊया ती काय बोलली...

'आई-वडील वेगळे झाले तेव्हा मला आनंद झाला', क्षिती जोग पहिल्यांदाच पालकांच्या घटस्फोटावर बोलली
'आई-वडील वेगळे झाले तेव्हा मला आनंद झाला', क्षिती जोग पहिल्यांदाच पालकांच्या घटस्फोटावर बोलली

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय दिग्गज अभिनेते म्हणून अनंत जोग ओळखले जातात. त्यांनी उज्वला जोग यांच्याशी लग्न केले होते. त्यांना अभिनेत्री क्षिती जोग ही एक मुलगी आहे. क्षितीने आजावर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत सर्वांची मने जिंकली आहेत. तिने काही चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. तिचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहेत. नुकताच क्षितीने आई आणि वडिलांच्या घटस्फोटावर भाष्य केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

क्षिती ही केवळ १८ वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यांच्या घटस्फोटानंतर क्षितीला सर्वात जास्त आनंद झाला होता. तिने नुकताच एका पॉडकास्टमध्ये सांगितले की जेव्हा आई-वडील वेगळे झाले तेव्हा मला आनंद झाला. तसेच तिने त्यांच्या नात्यावरही भाष्य केले आहे.
वाचा: सलूनच्या बाहेर स्वत:चा फोटो पाहून संतोष जुवेकरने केली मेजशीर पोस्ट, म्हणाला 'अपून तो हिरो बनगया!'

काय म्हणाली क्षिती?

'माझ्या आई-वडिलांच्या प्रवासात मी त्यांचे टोकाचे वादही पाहिले आहेत. ते दोघे माझ्यासमोर भांडायचे आणि त्यांची भांडणे पाहून मी अक्षरश: वैतागले होते. अगदी शेवटी त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांचा निर्णय ऐकून मला प्रचंड आनंद झाला. कारण आम्ही जेव्हा तिघे राहात होतो तेव्हा होणारे वाद, भांडणे या सगळ्यामुळे तिघेही दु:खी आयुष्य जगत होते. त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्ही सुखी झालो. तो योग्य निर्णय होता आमच्या सगळ्यांसाठी. आज आम्ही आनंदाने एकत्र येतो, जेवतो, भेटतो. ते आजही आईच्या हातचे खाण्यासाठी तिच्या घरी जातात' असे क्षिती म्हणाली.
वाचा: बायकोचं सामान उचलून कुशल बद्रिके निघाला फिरायला, मजेशीर फोटो शेअर करत म्हणाला...

आजही आई-वडिलांसोबत भांडणे होतात

पुढे क्षिती म्हणाली की, 'मी जरी त्यांच्यापासून वेगळी राहत असले तरीही त्यांना कायम माहिती असायचे मी कोणत्या वेळी कुठे आहे ते. कारण मी एक जबाबदार मुलगी असले तरी ते एक जबाबदार पालक देखील आहेत. जेव्हा एकटे राहायचे तेव्हा अनेकजण एकटी म्हणून सिंपथी द्यायला यायचे. आजही माझी त्यांच्यासोबत तितकीच भांडणे होतात. आईसोबत तर पूर्वीसारखीच होतात, पण बाबांसोबत अजून त्या लेव्हलपर्यंत गेलेले नाही.'
वाचा: लंडनमध्ये राधिका मर्चंट- अनंत अंबानीसाठी पाकिस्तानी गायक अतिफ असलमने गायले गाणे, फोटो व्हायरल

IPL_Entry_Point

विभाग