सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते हे प्रचार करण्यात व्यग्र आहेत. वायव्य मुंबई मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर निवडणूक लढणार आहेत. नुकताच अमोल यांची प्रचार यात्रा झाली. त्यांच्या प्रचार यात्रेत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा सहभागी झाल्याची आरोप भाजप पक्षाने केला. यावर अभिनेत्री केतकी चितळेने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
केतकी चितळे ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे मत मांडताना दिसते. आता केतकीने अमोल कीर्तिकर यांच्या प्राचर यात्रेत सहभागी झालेल्या इक्बाल मुसावर संताप व्यक्त केला आहे. तिने सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त केला आहे.
वाचा: बिग बॉस फेम वीणा जगतापचे छोट्या पडद्यावर पुनरागमन, 'या' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार
केतकीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला ही पोस्ट शेअर केली आहे. “लाज कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला? लकी पेट्रोल पंप उडाला (जो आम्हाला त्यावेळी ट्रकचे टायर फुटले असावे वाटले आवाज ऐकून) त्यातील आरोपीला स्टार प्रचारक म्हणून मिरवताय? कीर्तीकरांना तसेच मी मत देणार नव्हतेच पण आज बाळासाहेबांमुळे जो काही ०.०००१ टक्के आदर मनात होता तुमच्याविषयी, तोही तुम्ही मातीत मिळवण्यात यशस्वी झालात. राग, चीड, द्वेष, संताप अशा भावना देखील मनात येत नाहीयेत; येते आहे ती फक्त कीव,” असे केतकी म्हणाली.
वाचा: ती परत येतेय... ; तब्बल ९ वर्षांनंतर अभिनेत्री शिवानी सुर्वे दिसणार 'या' मालिकेत
महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांची प्रचार यात्रा नुकतीच पार पडली. या यात्रेत मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा सहभागी झाला होता. तो कीर्तीकर यांच्यासोबत असल्याचा गंभीर आरोप भाजपाने गुरुवारी केला. प्रचारयात्रेत कीर्तीकर यांच्याजवळ इक्बाल मुसा उभा असल्याचे काही फोटो व व्हिडीओ भाजपाचे आमदार अमित साटम यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. ते पाहून एकच खळबळ माजली. पण त्यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. प्रचारयात्रेत ४००-५०० लोक येतात, जवळ येऊन स्वत:ची ओळख सांगतात. त्यातील सगळ्यांना उमेदवार ओळखतात असे नाही असे कीर्तीकर म्हणाले होते.
वाचा: 'तुला पाहाते रे'नंतर सुबोध भावेचे पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन, नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित