भक्ती बर्वे यांच्या निधनाचे केदार शिंदे यांच्याशी कनेक्शन आहे माहिती आहे का? वाचा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  भक्ती बर्वे यांच्या निधनाचे केदार शिंदे यांच्याशी कनेक्शन आहे माहिती आहे का? वाचा

भक्ती बर्वे यांच्या निधनाचे केदार शिंदे यांच्याशी कनेक्शन आहे माहिती आहे का? वाचा

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 08, 2024 05:45 PM IST

'ती फुलराणी' गाजवणाऱ्या भक्ती बर्वे यांचा अंत हा अतिशय दु:खद होता. आता केदार शिंदे यांच्याशी काय कनेक्शन आहे चला जाणून घेऊया…

Bhakti Barve
Bhakti Barve

‘ती फुलराणी’ पुन्हा होणे नाही, असे अनेकदा म्हटले जाते. पण हे वाक्य अभिनेत्री भक्ती बर्वे यांच्यासाठी घेतले जाते. एका मुलाखतीत बॉलिवूड अभिनेता नसिरुद्दीन शाह यांनी म्हटलं होत कि, 'भक्ती बर्वे भारतच नाही तर जागतिक रंगभूमीवरील मी पाहिलेली सर्वात श्रेष्ठ अभिनेत्री आहे.' रंगभूमीवरील सम्राज्ञी, म्हणून भक्ती बर्वे यांची ओळख होती. पु. ल.देशपांडे यांची "फुलराणी " भक्ती बर्वे यांनी जीवंत केली होती. त्यानंतर बऱ्याच अभिनेत्रींनी फुलराणी साकारली पण भक्तीची सर कुणालाही आली नाही. मराठी, हिंदी गुजराती रंगमंचावर त्यांचे नाव मोठे होते. पण तुम्हाला माहिती आहे का भक्ती बर्वे यांच्या निधनाशी दिग्दर्शक

भक्ती यांच्या कामाविषयी

अभिनेत्री भक्ती बर्वे यांच्या एक नाटकातील भूमिका पाहून नासिरुद्दीन शाह इतके प्रभावित झाले कि त्यांनी जाने भी दो यारो या चित्रपटातील भूमिकेसाठी कुंदन शाह यांच्याकडे भक्ती यांचे नाव सुचवले होते. ‘आई रिटायर होतेय’, ‘गांधी आणि आंबेडकर’, ‘ती फुलराणी’, ‘रंग माझा वेगळा’ अशा बऱ्याच नाटकांत भक्ती यांनी भूमिका निभावल्या आहेत. ‘ती फुलराणी’मधली ‘मंजुळा’ आणि ‘आई रिटायर होतेय’ या नाटकातली ‘आई’ची या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. भक्ती बर्वे यांनी फक्त अभिनेत्रीची भूमिकाच नाही, तर दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केले आहे. ७०-८० दशकांत त्यांनी दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून काम केलं; शिवाय दूरदर्शनवरील काही मालिकांमध्येही त्यांनी काम केलं. मात्र, अशा चतुरस्त्र अभिनेत्रीचा शेवटचा काळ फारच दुःखद होता.

पतीचे झाले निधन

१३ मार्च १९९६ साली भक्ती बर्वे यांचे पती शफी इनामदार यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. शफी हे हिंदी मलिका व सिनेसृष्टीमध्ये लोकप्रिय कलाकार होते. त्यांच्या आनंदी संसारातुन शफी यांनी घेतलेल्या अचानक एक्झीटमुळे भक्ती या पार कोसळून गेल्या होत्या.

भक्ती यांच्या अखेरचा काळाबद्दल शाहीर साबळे यांच्या मुलगी वसुंधरा साबळे यांनी दिली माहिती-

भक्ती बर्वे यांचं शाहीर साबळे यांच्याशी खूप जवळच नातं होत. त्या त्यांचा मुलीसारख्या होत्या. काहीही अडचण आली किंवा काहीही महत्वाचा निर्णय घ्यायचा असला की भक्ती बाबांचाच सल्ला घेत असे. अगदी शफी इनामदार बरोबर लग्नाचा निर्णय घेताना देखील त्यांनी बाबांना फोन केला होता. शफी यांचा निधनानंतरही बाबांनी त्यांना धीर द्यायचा प्रयत्न केला होता. मात्र, खचलेल्या भक्तीने स्वत:ला कामात झोकून दिले.

२००१ मध्ये वाईच्या कृष्णाबाई उत्सवासाच्या कार्यक्रमासाठी भक्ती वाईला गेल्या होत्या. तेव्हा बाबाही नेमके वाईला मुक्कामाला होते. त्यांना भेटण्यासाठी त्या घरी आल्या. दुसऱ्या दिवशी भक्ती यांना मुंबईत महत्त्वाचं काम होते. त्यामुळे त्यांना परतावे लागणार होते. वाईतला सोहळा आटपून त्या मुंबईला जायला निघाल्या. निघताना बाबा तिला म्हणाले, "रात्री प्रवास करु नकोस इथेच बंगल्यावर ये आणि सकाळी ब्रेकफास्ट करुन नीघ.." मात्र, भक्ती बर्वे स्वभावाने फार हट्टी होत्या. बाबांचे बोलण त्यांनी ऐकलं नाही आणि त्या निघाल्या.
वाचा: सूरज चव्हाणवर आली सिमेंटच्या गोणी उचलण्याची वेळ, गावात राबतानाचा व्हिडीओ व्हायरल

मात्र १२ फेब्रुवारी २००१ रोजीची त्या रात्री काळानं त्यांच्यावर घाला घातला. प्रवासात ऐन पहाटे ड्रायव्हरचा क्षणभर डोळा लागला. त्यांच्या भरधाव गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्येच त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या केवळ ५२व्या वर्षी एक गुणी, प्रतीभावान अभिनेत्री जागीच काळाच्या पडद्याआड गेली. विशेष म्हणजे भक्ती प्रवासात गाडीच्या वेगाला प्रचंड घाबरायच्या आणि त्याच वेगामुळे त्यांचा जीव गेला. बातमी समजताच बाबा सुन्न झाले त्यांनी नंतर काही दिवस टी.व्ही.च्या बातम्या आणि वर्तमानपत्राकडे ढुंकुनही पाहीलं नाही.

भक्ती बर्वे यांच्या निधनाची चाहूल ही केदार शिंदे यांचे आजोबा शाहिर साबळे यांना आधीच लागली होती असे म्हटले जाते.

Whats_app_banner