मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  वयाच्या १७व्या वर्षी लग्नाची मागणी, मूल न होऊ देण्याचा निर्णय; वाचा अमृता सुभाषची लव्हस्टोरी

वयाच्या १७व्या वर्षी लग्नाची मागणी, मूल न होऊ देण्याचा निर्णय; वाचा अमृता सुभाषची लव्हस्टोरी

Aarti Vilas Borade HT Marathi
May 14, 2024 09:02 AM IST

आज १३ मे रोजी अमृता सुभाषचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घ्या तिच्या खासगी आयुष्याविषयी. अमृताचा पती कोण आहे, काय करतो याविषयी…

अमृता सुभाषची लव्हस्टोरी
अमृता सुभाषची लव्हस्टोरी

मराठीसह हिंदी सिनेसृष्टी अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता सुभाष. अभिनयाचं बाळकडू अमृताला घरातूनच मिळाले होते. अमृताची आई ज्योती सुभाष या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांच्यासोबतच अनेक जेष्ठ कलाकारांनी अमृताला अभिनयाच्या धडे दिले होते. त्यामुळे अमृताला देखील चित्रपटसृष्टीमध्ये अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणे सोपे झाले होते. आज १३ मे रोजी अमृताचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

ट्रेंडिंग न्यूज

कोण आहे अमृता सुभाषचा पती?

अमृता सुभाषने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा सख्खा भाऊ संदेश कुलकर्णीशी लग्न केले आहे. वयाच्या १७व्या वर्षीच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांची पहिली भेट सोनालीच्या वाढदिवशी झाली होती. अमृता आणि सोनाली या दोघीही चांगल्या मैत्रीणी असल्याचे सांगायची गरज नाही. त्यांच्या मैत्रीच्या कायमच चर्चा रंगलेल्या असतात. दोघीही एकमेकींच्या घरी सतत जात येत होत्या. एकदा अमृता अगदी सहज सोनालीच्या घरी गेली होती. तेव्हा संदेश तेथे स्वत:ची तयारी करत होता. ते पाहून अमृता त्याच्या प्रेमात पडली.
वाचा: 'तिने केलेला त्याग, लोकांचे सोसलेले टोमणे...', आईने दिले अभिनेत्री हेमांगी कवीला सरप्राइज

अमृता सुभाषची पहिली भेट

अमृता आणि संदेश यांनी सर्वात आधी एका नाटकात काम केले. या नाटकाचे नाव 'पाटर्नर' असे होते. या नाटकाच्या वेळी अमृताचे वय हे केवळ साडे सतरा वर्षे होते. नाटकाच्या निमित्ताने संदेश आणि अमृताच्या भेटी वाढू लागल्या होत्या. त्यानंतर अमृताने स्वत: संदेशला लग्नासाठी विचारले. संदेश अमृतापेक्षा जवळपास सहा वर्षांनी मोठा होता. पण त्याचा समजूतदार स्वभाव असल्यामुळे सुरुवातीला त्याने अमृताला समजावण्याचा प्रयत्न केला.
वाचा: वर्षभराच्या आतच कलर्स मराठी वाहिनीवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, पोस्टने वेधले लक्ष

संदेशमुळे अमृताने दिला होता एनएसडीला नकार

जेव्हा संदेश आणि अमृताची भेट झाली तेव्हाच तिला एनएसडीमध्ये पाठवण्याचा विचार सुरु होता. पण संदेश आणि तिच्यामध्ये दुरावा निर्माण होईल म्हणून अमृता नकार देत होती. एका मुलाखतीमध्ये अमृताने स्वत: हा खुलासा केला होता.“एकतर तू अजून लहान आहेस आणि हे वय आता काम करायचे आहे. प्रेमाचा विचार करण्याचे खरंतर हे वय नाही. त्याच्यामुळे तू नक्कीच एनएसडीला जा. आता तू खूप लहान आहेस. समज, तिथे जर तुला दुसरा कोणी मुलगा आवडला तर फक्त मला शब्द दिलाय म्हणून तू परत कधीच येऊ नकोस. तुला जर ३ वर्षांनी आतून वाटले ना तर तू परत ये, फक्त शब्द दिलाय म्हणून नाही. कारण तू अजून लहान आहेस. हे आकर्षणही असू शकते. त्यामुळे तिथे तू पूर्णपणे तुझ्या कामाकडे लक्ष दे.” नंतर अमृता शिक्षण पूर्ण करुन आली आणि संदेशशी विवाह केला. त्यांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.
वाचा: बॉक्स ऑफिसवर राजकुमार राव च्या 'श्रीकांत' चा जलवा! शनिवारच्या कमाईत जबरदस्त वाढ

IPL_Entry_Point

विभाग