मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे. अमृता कायमच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असते. सध्या सोशल मीडियावर अमृताच्या एका पोस्टची जोरदार चर्चा सुरु आहे. या पोस्टमध्ये तिने मुंबई पोलिसांसाठी उफ्फ ये अदा!' असे म्हटले आहे. नेमकं प्रकरण काय आहे? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.
अमृताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने मुंबई पोलिसांची पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट तिने शेअर करत 'मुंबई पोलीस गॉट नो चिल्ल उफ्फ ये अदाये' असे म्हटले आहे. अमृताने खरं तर मिश्किलपणे मुंबई पोलीस आणि त्यांचा भन्नाट क्रिएटिव्हीचे कौतुक केले आहे. सध्या सोशल मीडियावर तिची ही पोस्ट व्हायरल झाला आहे.
वाचा: 'फॅमिली मॅन ३' सीरिजमध्ये शरद केळकर दिसणार की नाही?, अभिनेत्याने स्वत: केला खुलासा
सध्या संजय लीला भन्साळी यांची 'हिरामंडी' ही वेब सीरिज चांगलीच चर्चेत आहे. मुंबई पोलिसांनी हिरामंडी डायलॉग स्टाईल मध्ये प्रेक्षकांना खास संदेश दिला आहे. 'एक बार देख लिजिए, दिवाने बना दिजिए, चलान काटने के लिए तय्यार है हम, तोह हेल्मेट पेहेन लिजिए' असे मुंबई पोलिसांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
वाचा: कभी नहीं मारा चौका तो बाद में नहीं मिलेगा मौका; "होय महाराजा"चा मजेशीर ट्रेलर पाहिलात का?
आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी २४ तास काम करणाऱ्या मुंबई पोलिसांच करावे तेवढे कौतुक कमीच आहे. कायम नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी त्यांची काळजी घेण्यासाठी ते त्यांना आव्हान करत असतात. पण मुंबई पोलीस यांनी एकदम फिल्मी स्टाईलने आता नागरिकांना सुरक्षित राहण्याच आव्हाने केले आहे. त्यांची ही फिल्मी स्टाईल सर्वांना आवडत आहे.
वाचा: ‘बिग बॉस मराठी सीझन ५’मध्ये महेश मांजरेकर का करणार नाहीत सूत्रसंचालन? समोर आलं मोठं कारण!
अमृता खानविलकर नुकताच जय मेहता यांच्या ‘लुटेरे’ या वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. या सीरिजमधील तिच्या भूमिकेने सर्वांची मने जिंकली. तसेच आगामी काळात तिचा ‘पठ्ठे बापूराव’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओकने केले आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत.
संबंधित बातम्या