मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकर ओळखली जाते. तिने अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अमृता ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती सतत नवनवीन फोटोशूट करताना दिसते. तसेच तिच्या आयुष्यातील अनेक घडामोडींवर देखील बोलताना दिसते. नुकताच सोशल मीडियावर अमृताकडे एका चाहत्याने अजब मागणी केली आहे. त्यावर तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आता नेमकं काय झालं आहे? चला जाणून घेऊया...
सोशल मीडियावर चाहते मंडळी आपल्या आवडत्या कलाकारांकडे अनेक प्रकारच्या मागण्या करताना दिसतात. कधीकधी कलाकरही या मागण्या पूर्ण करतात. अशीच काहीशी मागणी एका चाहत्याने अमृताकडे केली आहे. या चाहत्याने अमृताला थेट लग्नासाठी विचारले आहे. याआधी अनेक चाहत्यांनी आपल्या आवडत्या अभिनेत्रींना लग्नासाठी विचारले असल्याचे पाहायला मिळाले आहे. सोशल मीडियाद्वारे प्रेम व्यक्त करण्याची ही एक पद्धत आहे. अशातच अभिनेत्री अमृता खानविलकरला एका चाहत्याने सोशल मीडियाद्वारे लग्नाची मागणी घातली असून अभिनेत्रीने या संवादाचा स्क्रीनशॉट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला आहे आणि त्याला खास शैलीत उत्तरही दिलं आहे.
सोशल मीडियावर अमृताला एका नेटकऱ्याने लग्नाची मागणी घालत, “अमृता खानविलकर मला तुझ्याशी लग्न करायला आवडेल. मला तू खूप आवडते आणि मी तुझ्याशी लग्न करायला उत्सुक आहे. कृपया मला तुझा आजीवन पती बनव. मी भारतीय सुनील” असे म्हटले आहे. त्यावर अमृताने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. नेटकऱ्याच्या या अजब मागणीला अमृता खानविलकरनेही उत्तर देत असं म्हटलं आहे की, “नमस्कार, भारतीय सुनील. तुमच्या या ऑफरबद्दल धन्यवाद. पण मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही, जरी तुम्हाला माझे आयुष्यभराचे पती व्हायचे असले तरी… खरंच मला माफ करा.”
वाचा: बंद करा आता हे; सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर मीडियावर संतापली करीना कपूर खान
अमृताच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिचा ‘संगीत मानापमान’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातील तिच्या ‘वंदन हो’ या गाण्यातील डान्सने सर्वांची मने जिंकली. याआधी तिचा ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’, ‘लाइक आणि सबस्क्राईब’ हे सिनेमे प्रदर्शित झाले. तसेच तिची एक हिंदी वेब सीरिज देखील प्रेक्षकांच्या भेटीला आली.
संबंधित बातम्या