‘मी धर्माने आणि संस्काराने मराठी!’; अभिनेत्री अमृता खानविलकर का संतापली? पोस्ट लिहित म्हणाली...-marathi actress amruta khanvilkar angry on trollers wrote post on facebook ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘मी धर्माने आणि संस्काराने मराठी!’; अभिनेत्री अमृता खानविलकर का संतापली? पोस्ट लिहित म्हणाली...

‘मी धर्माने आणि संस्काराने मराठी!’; अभिनेत्री अमृता खानविलकर का संतापली? पोस्ट लिहित म्हणाली...

Apr 11, 2024 10:38 AM IST

अभिनेत्री अमृता खानविलकर हिने सोशल मीडियाची मदत घेऊन एक पोस्ट शेअर करत आपल्या मनातील भावना आणि खदखद व्यक्त केली आहे.

‘मी धर्माने आणि संस्काराने मराठी!’; अभिनेत्री अमृता खानविलकर का संतापली? पोस्ट लिहित म्हणाली...
‘मी धर्माने आणि संस्काराने मराठी!’; अभिनेत्री अमृता खानविलकर का संतापली? पोस्ट लिहित म्हणाली...

कलाकार मंडळी म्हटलं की, ट्रोलिंग हे त्यांना सहन करावंच लागतं. एखाद्याने चांगलं केलं तरी लोक त्याला ट्रोल करतात आणि एखाद्याची चूक झाली तरीही ट्रोल केलं जातं. अर्थात कलाकारांसाठी हे रोजचं असलं, तरी एक माणूस म्हणून त्यांनाही या गोष्टीचा नक्कीच त्रास होतो. तरी, कलाकार मंडळी सोशल मीडिया आणि नेटकऱ्यांच्या या ट्रोलिंगकडे नेहमीच दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, कधीकधी स्वतःबद्दल काही चुकीच्या गोष्टी ऐकल्यावर प्रत्येकाला ज्या प्रकारे राग येतो, तसाच कलाकारांना येतो. वाईट सगळ्यांनाच वाटतं. अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्यासोबत देखील असंच काहीसं घडलं आहे. यावेळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने सोशल मीडियाची मदत घेऊन एक पोस्ट शेअर करत आपल्या मनातील भावना आणि खदखद व्यक्त केली आहे.

काय म्हणाली अमृता खानविलकर?

अमृता खानविलकर हिने तिच्या फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. यात ती म्हणते, ‘आशा करते तुमचा गुढी पाडवा छान साजरा झाला असेल.... नव्या वर्षाची सुरुवात तुम्ही मागच्या गोष्टी विसरून केलीच असणार.... नवीन मनोकामना.... नवी स्वप्ने... देवा चरणी ठेऊन त्या पूर्ण व्हाव्या अशी प्रार्थना केली असणार.... जर तुम्ही हे सगळं केलंय तर तुमच्या सारखीच मी सुद्धा आहे मी हि हेच केलं.... कारण मी हि फक्त नावाने नाही तर धर्माने मराठी आहे.... संस्काराने मराठी आहे.... मूळची कोंकणातील.... पण जन्म मुंबईचा आहे.... मी हि कोणाची तरी मुलगी आहे... बहीण आहे.... मावशी आहे.... ताई आहे.... मैत्रीण आहे.... बायको आहे.... आणि मग मी ज्या क्षेत्रात काम करते त्यामुळे मी एक अभिनेत्री आहे.’

मज्जा वाटते तुम्हाला? अभिनेत्री संतापली

पुढे अमृता लिहिते, ‘तुम्हाला हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे गेले काही दिवस नवीन कामाच्या निमित्ताने मी वेगवेगळे इंटरव्ह्यू देत आहे.... वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर.... आता ह्या क्षेत्रात असल्यामुळे कधीतरी चांगलं कधीतरी वाईट हे ऐकण्याची सवय झालीच आहे... पण ट्रोलिंगच्या नावाखाली इतक्या घाणेरड्या आणि लाजिरवाण्या गोष्टी प्रेक्षक बोलतात की लाज वाटते.... वेषभूशा असो... हसणं असो... बोलणं असो... एका स्त्रीच्या प्रत्येक गोष्टीवर किती… किती बोलायचं? आणि त्याला काही सीमा का नाहीये? जे लोक स्वतःचं खरं नाव किंवा साधा डीपीसुद्धा लावत नाहीत अशी लोक बोलतात? मज्जा वाटते तुम्हाला? मला असं वाटतं तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे.... सोशल मीडियाचा चांगला वापर सगळ्यांनाच करता येतो असं नाहीये.... पण ह्यावर जे तुम्ही लिहिता... बोलता... ह्यात फक्त आणि फक्त तुमचे संस्कार दिसतात.’

‘असो मी नेहमी या गोष्टींकडे दुर्लक्ष करतेच.... पण कधी कधी समोरच्याला हे सांगणं गरजेचं असतं की, गप्प राहणं हे दुबळेपण नाही, तर ताकद आहे.- अमृता खानविलकर’. अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या या पोस्टमधून सगळ्या ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं आहे.

Whats_app_banner