मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय

मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय

Aarti Vilas Borade HT Marathi
May 20, 2024 04:21 PM IST

एका मराठमोळ्या अभिनेत्रीचे नाव मतदान यादीतून डिलिट करण्यात आले. त्यानंतर तिने त्यावर काय उपाय केले हे लोकांना सांगितले आहे.

मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावर काय करावे
मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावर काय करावे

आज लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडत आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी सामान्य नागरिकांपासून ते कलाकारांपर्यंत जवळपास सर्वजण मतदान करण्यासाठी बाहेर पडले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर मतदान केल्यानंतर बोटाला लावलेल्या शाईचे फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, एका मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती दिली आहे. तिने जर मतदार यादीतून तुमचे नाव डिलिट झाले असेल तर त्यावर काय उपाय करावा हे सांगितले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कोण आहे ही अभिनेत्री?

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून आदिती सारंग आहे. आदिवतीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर मतदान केल्यानंतर बोटाला लावलेल्या शाईचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने जर मतदार यादीतून तुमचे नाव डिलिट झाले तर काय करायचे यावर उपाय सांगितला आहे.
वाचा : उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

काय आहे अभिनेत्रीची पोस्ट?

'ज्यांची नावे मतदार यादीतून delete झाली आहेत, म्हणजे यादीत नावावर *deleted* असा शिक्का लागला आहे. ते लोक मतदान केंद्रावर *form no 17* भरून आणि आपले voting कार्ड दाखवून मतदान करू शकणार आहेत. तरी विनंती आहे कि ज्यांची नावे यादीमध्ये दिसत नाहीत त्यांनी मतदान केंद्रावर येऊन वरील procedure follow करावी आणि मतदानाचा हक्क बजवावा. आठवणीने मतदान करावे आणि भरभरून करावे' असे कॅप्शन आदिवतीने फोटो शेअर करत दिले आहे.
वाचा: अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

आदिती सारंगच्या कामाविषयी जाणून घ्या

आदिती सारंगच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिने एक काळ असा होता की मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली होती. तिने वादळवाट, येऊ कशी तशी मी नांदायला, ह.म.बने तु.म.बने या काही हिट मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. आता सध्या आदिती रंगभूमीवर सक्रिय दिसत आहे. ती अभिनेता अस्ताद काळे सोबत 'मास्टर माईंड' या नाटकात काम करताना दिसत आहे. आता आदिती कोणत्या मालिकेत पुन्हा दिसणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तिला पुन्हा मालिकेत पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: मोडलेला हात घेऊन ऐश्वर्या राय बच्चनचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जलवा, लूक चर्चेत

टी-२० वर्ल्डकप २०२४