ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेते विजय कदम यांचं कर्करोगानं निधन, टायमिंगचा बादशहा हरपला!-marathi actor vijay kadam passed away ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेते विजय कदम यांचं कर्करोगानं निधन, टायमिंगचा बादशहा हरपला!

ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेते विजय कदम यांचं कर्करोगानं निधन, टायमिंगचा बादशहा हरपला!

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 10, 2024 02:55 PM IST

Vijay Kadam Death: अभिनेते विजय कदम हे गेले दीड वर्ष कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचे निधन झाले.

Vijay Kadam
Vijay Kadam (Vijay Kadam Instagram)

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन झाले आहे. आज १० ऑगस्ट रोजी अंधेरी येथील निवासस्थानी त्यांनी सकाळी अखेरचा श्वास घेतला. विजय कदम यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून विजय कदम यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

कर्करोगाशी झुंज अपयशी

अभिनेते विजय कदम हे गेले दीड वर्ष कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचार सुरु असताना आज सकाळी त्यांचे निधन झाले. मराठी चित्रपटसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावला असल्याची भावना सर्वजण व्यक्त करत आहेत. विजय कदम यांनी वयाच्या ६७व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंधेरी ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

विजय कदम यांच्याविषयी

विजय कदम यांनी आजवर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या होत्या. आनंदी आनंद (१९८७), तेरे मेरे सपने (१९९६), देखणी बायको नाम्याची (२००१), रेवती (२००५), टोपी घाला रे (२०१०), ब्लफमास्टर (२०१२), भेट तुझी माझी (२०१३) आणि मंकी बात (२०१८) अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांसोबतच विजय कदम यांनी काही नाटके आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी टूरटूर, पप्पा सांगा कोणाचे, इच्छा माझी पुरी करा आणि सही दे सही या मध्ये ते दिसले होते.
Phir Aayi Hasseen Dillruba Review: पंडीत करणार राणीचे आयुष्य उद्ध्वस्त! वाचा 'फिर है हसीन दिलरुबा'चा रिव्ह्यू

विजय कदम यांनी काही दिवसांपूर्वी 'इट्स मज्जा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्या आजारपणाविषयी सांगितले होते. 'या आजारपणात माझ्यासोबत माझी पत्नी आणि मुलगा गंधारची साथ मिळाली. हे दोघेही माझ्यामागे खंभीरपणे उभे राहिले. एक वाईट स्वप्न समजून मी यातून बाहेर पडत आहे. अनेकदा माणसे यातून लवकर बाहेर पडत नाहीत. पण मी पडलो. त्यात नशिबाने मला चांगले डॉक्टर मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि माझ्या पत्नीच्या साथीमुळे मी या आजारावर मात करु शकलो असे मला वाटते' असे विजय कदम म्हणाले होते.

शरद पवार यांनी वाहिवी श्रद्धांजली

‘मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जेष्ठ अभिनेते विजय कदम यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झालं. मराठी चित्रपट, मालिका तसेच रंगभूमीवर छोट्या भूमिकांपासून ते अगदी मुख्य नायकांपर्यंतच्या सर्व भूमिका त्यांनी लीलया पार पाडल्या. आपल्या विनोदी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. अशा लोकप्रिय कलावंतास भावपूर्ण श्रद्धांजली..!!’ या आशयाची पोस्ट शरद पवार यांनी केली आहे.

विभाग