Swapnil Joshi: एका हातात सिगरेट आणि दुसऱ्या हातात बंदूक; स्वप्नील जोशीच्या फोटोची जोरदार चर्चा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Swapnil Joshi: एका हातात सिगरेट आणि दुसऱ्या हातात बंदूक; स्वप्नील जोशीच्या फोटोची जोरदार चर्चा

Swapnil Joshi: एका हातात सिगरेट आणि दुसऱ्या हातात बंदूक; स्वप्नील जोशीच्या फोटोची जोरदार चर्चा

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 03, 2024 04:24 PM IST

Swapnil Joshi: सध्या सोशल मीडियावर अभिनेता स्वप्नील जोशाची एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्याच्या एका हातात सिगरेट आणि दुसऱ्या हातात बंदूक दिसत आहे. या फोटोची जोरदार चर्चा सुरु आहे.

swapnil joshi
swapnil joshi

Swapnil Joshi Upcoming Movie: मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. त्याचा बेधडक आणि डॅशिंग अंदाज पाहायला प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. सध्या सोशल मीडियावर स्वप्नीलचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये त्याचा खतरनाक लूक पाहून चाहत्यांना प्रश्न पडला आहे की स्वप्नीलला नेमकं झालं तरी काय? चला जाणून घेऊया स्वप्नीलच्या या लूक मागिल रहस्य...

काय आहे फोटो?

सोशल मीडियावर स्वप्नील जोशीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये स्वप्नील एकदम रावडी अंदाजात दिसत आहे. त्याच्या एका हातात सिगरेट आहे तर दुसऱ्या हातात त्याने बंदुक पकडली आहे. चॉकलेट बॉय अशी इमेज असणारा स्वप्नील रावडी लूकमध्ये चक्क सिगरेट ओढतोय आणि हातात बंदुक घेऊन का उभा आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. व्हायरल होणारा फोटो हा स्वप्नीलच्या आगामी सिनेमातील आहे. 'जिलबी' या सिनेमात स्वप्नील एकदम हटके अंदाजात दिसणार आहे.

स्वप्नीलच्या सिनेमाविषयी

‘जिलबी’ या मराठी चित्रपटामुळे स्वप्नील पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटात तो विजय करमरकर या डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दमदार मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले आहे. ही खुमासदार ‘जिलबी’ १७ जानेवारीला आपल्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत. तसेच त्यांच्यासोबत अभिनेत्री शिवानी सुर्वे देखील दिसणार आहे.
वाचा: प्रियकरासोबतचा वाद कोर्टापर्यंत गेला, आकस्मिक मृत्यू झाला! पद्मा चव्हाण यांच्यासोबत नेमकं काय घडलं होतं?

काय असणार चित्रपटाची कथा?

'जिलबी' या चित्रपटातील स्वप्नीलचा लूक पाहून कथा काय असणार असा प्रश्न पडला आहे. हा एक गूढ चित्रपट आहे. तसेच चित्रपटात काय पाहायला मिळणार याविषयी स्वप्नील म्हणाला, ‘आपला पोलिसी खाक्या दाखवत चोख कामगिरी बजावणारा हा पोलीस अधिकारी आहे. माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका मला करायला मिळाल्याचा आनंद आहे. विशेष म्हणजे पोलिसांचा अंदाज त्यांच्या जबरदस्त व्यक्तिमत्वाचा लहेजा हे सगळं करण्यात एक वेगळीच मजा आली. प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा ‘जिलबी’ हा चित्रपट आहे. स्वादिष्ट जिलबी वेगवेगळ्या प्रक्रियांमधून जात असते.‘जिलबी’ हा चित्रपटसुद्धा वेगवेगळ्या चवींचा आस्वाद आपल्याला देणार आहे, ज्यात विविध व्यक्तिरेखा, त्यांचे स्वभाव वैशिष्ट्ये आणि सोबत रहस्याचा थरार असं बरंच काही आहे.'

Whats_app_banner