मराठी इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीमधील एक नाव म्हणजे सुशांत शेलार. त्याने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच तो बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमध्ये देखील सहभागी झाला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुशांत हा इंडस्ट्रीपासून दूर असल्याचे पाहायला मिळत होते. आता सुशांत बऱ्याच दिवसांनंतर कॅमेरासमोर आला आहे. पण त्याचा बदललेला लूक पाहून सर्वजण चकीत झाले आहेत.
सुशांत शेलारने बरेच वजन कमी केले आहे. त्याच्या शरीरामध्ये झालेला बदल पाहून अनेकांनी गंभीर आजार तर झाला नाही ना असा प्रश्न पडला आहे. त्याचप्रमाणे त्याच्या तब्येतीसाठी त्याचे चाहते प्रार्थना देखील करत होते. पण सुशांत इतका बारीक का झाला याचं उत्तर आता स्वत: सुशांतनेच दिलं आहे. सुशांतने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. त्यामध्ये त्याने त्याच्या तब्येतीविषयी माहिती दिली.
सुशांत प्रकृतीविषयी बोलताना म्हणाला, 'मायबाप रसिक प्रेक्षकांना माझ्याविषयी जी काळजी वाटत, त्यांनी माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना मागितली त्यासाठी खरच मनापासून आभार मानतो. स्वामींच्या कृपेने माझी तब्येत ठणठणीत आहे. मला कोणताही महाभंयकर आजार झालेला नाही. माझ्या कमी झालेल्या वजनाविषयी सांगायचं झालं तर माझा रानटी नावाचा सिनेमा येत्या २२ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. समित कक्कडने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. त्यानेच मला या चित्रपटातील भूमिकेसाठी १० किलो वजन कमी करायला लावले.'
पुढे सुशांत म्हणाला की, 'गेल्या काही दिवसांपासून सतत त्याला फूड पॉयजनिंग तसेच फूड अॅलर्जी होत आहे. त्यानंतर मी काही वैद्यकीय चाचण्या केल्या, त्यामध्ये मला ग्ल्युटन ऍलर्जी डिटेक्ट झाली. ज्यामध्ये मला गहू, ब्रेड, अशा गोष्टींवर बंधनं आली आहेत. या सगळ्यामुळे माझे वजन कमी होत गेलं. जवळपास ७ ते ८ किलो वजन यामुळेच कमी झाले. आता पुन्हा वजन वाढवण्यासाठी मला वेळ लागणार आहे.'
वाचा: पतौडी शाही पॅलेस बनणार म्यूझियम? सैफ अली खानने सांगितले सत्य, वाचा…
सुशांत शेलार हा भारतीय चित्रपट अभिनेता आहे, जो मुख्यतः मराठी चित्रपट उद्योगात काम करतो. त्याने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजन मालिका "मयूर पंख" मध्ये केली. नंतर तो "गोझीरवाण्या घरात" या मालिकेत दिसला. त्यानंतर त्याने "बेधुंद" (२००९), "वंशवेल" (२०१३), "दुनियादारी" (२०१३), "क्लासमेट्स" (२०१५), "तू ही रे" (२०१५), "३५ टक्के कट्टावार पास" (२०१६), "गर्भ" (२०१९), "खारी बिस्किट" (२०१९) आणि "विजेता" (२०२०) सारख्या चित्रपटात काम केले.