शिव ठाकरेही झालाय कास्टिंग काउचचा शिकार; आपबिती सांगताना म्हणाला 'कपड्यांचे माप घेण्याच्या बहाण्याने...'
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  शिव ठाकरेही झालाय कास्टिंग काउचचा शिकार; आपबिती सांगताना म्हणाला 'कपड्यांचे माप घेण्याच्या बहाण्याने...'

शिव ठाकरेही झालाय कास्टिंग काउचचा शिकार; आपबिती सांगताना म्हणाला 'कपड्यांचे माप घेण्याच्या बहाण्याने...'

Mar 26, 2024 08:33 AM IST

अभिनेता शिव ठाकरे पहिल्यांदाच त्याच्या कास्टिंग काउचच्या अनुभवाबद्दल उघडपणे बोलला आहे. शिव ठाकरे याने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

शिव ठाकरेही झालाय कास्टिंग काउचचा शिकार; आपबिती सांगताना म्हणाला 'कपड्यांचे माप घेण्याच्या बहाण्याने...'
शिव ठाकरेही झालाय कास्टिंग काउचचा शिकार; आपबिती सांगताना म्हणाला 'कपड्यांचे माप घेण्याच्या बहाण्याने...'

‘बिग बॉस’ फेम मराठमोळा शिव ठाकरे एकामागून सध्या एक रिॲलिटी शो करत आहेत. ‘बिग बॉस’ केल्यानंतर त्याचे नशीबच पालटले आहे, असे वाटत आहे. मात्र त्याचा हा प्रवास कधीच सोपा नव्हता. याआधीही त्यांनी अनेक वाईट दिवस पाहिले होते. आता नुकतेच शिव ठाकरे याने त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देत, सरून गेलेल्या दिवसाच्या आठवणी जागवल्या. यावेळी तो आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल बोलला. दरम्यान, शिव ठाकरे याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेता शिव ठाकरे पहिल्यांदाच त्याच्या कास्टिंग काउचच्या अनुभवाबद्दल उघडपणे बोलला आहे.

शिव ठाकरे ठरलाय कास्टिंग काउचचा बळी

आपल्यालाही कधीकाळी कास्टिंग काउचचा सामना करावा लागल्याचा खुलासा शिव ठाकरे याने केला आहे. त्याच्यासोबत असे कृत्य घडले, जे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शिव ठाकरे याने सांगितले होते की, जेव्हा त्याला अभिनयाच्या जगात पाऊल टाकायचे होते, तेव्हा त्याने ५-६ वर्षे रंगभूमीवरही कामे केली होती. त्याला काही मराठी चित्रपटांची ऑफर आली असून, तो स्वत: यावर काम करत आहे. अभिनेत्याने सांगितले की, जेव्हा तो ऑडिशनसाठी गेला होता, तेव्हा त्याला एका करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले होते. मात्र, या कामासाठी त्याला ५० हजार रुपये द्यावे लागणार होते. या ५० हजारांच्या बदल्यात त्याला काम मिळणार होते. तर, या कामासाठी त्याला दररोज २५ हजार रुपये मिळणार होते.

मनोरंजन विश्वाचा लाडका ‘व्हिलन’; अभिनेते प्रकाश राज यांच्याबद्दल ‘या’ भन्नाट गोष्टी ऐकल्यात का?

स्टुडिओत बोलावले अन्

मात्र, त्यावेळी शिव ठाकरेकडे तेवढा पैसा नव्हता. त्यामुळे त्याने ही ऑफर नाकारली होती. त्याने पुढे खुलासा केला की, ‘बिग बॉस मराठी’ जिंकल्यानंतर त्याला एका कार्यक्रमात हजेरी लावायची होती आणि त्यासाठी त्याने एका प्रसिद्ध डिझायनरशी संपर्क साधला. शिवने खुलासा केला की, डिझायनर आणि व्यवस्थापकानेच त्याला त्यांच्या स्टुडिओत बोलावले होते, जेणेकरून ते त्याच्या कपड्यांचे माप घेऊ शकतील. यानंतरच त्याला कपडे मिळणार होते. पण, शिव तिथे गेल्यावर काहीतरी वेगळेच घडले आणि त्याला याची कल्पना देखील नव्हती.

‘सायली’ने पुन्हा मारली बाजी, आर ‘अरुंधती’ यावेळीही आऊट! पाहा या आठवड्याच्या ‘टॉप ५’ मराठी मालिका

शिव ठाकरेही चिडला

अभिनेता शिव ठाकरे जेव्हा तिथे पोहोचला, तेव्हा त्या डिझायनरच्या टीममधील एका सदस्याने त्याला वेगळ्याच प्रकारे पसंत केले. मग, तो शिव ठाकरेला कपडे दाखवण्याऐवजी इतर गोष्टींबद्दल बोलू लागला. तो माणूस शिवला सांगू लागला की, त्याने काही खास गोष्टींसाठी नवीन स्पा उघडला आहे. त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून शिव चकित झाला आणि त्याची चिडचिडही झाला. शिव रागाने तेथून निघून गेला. मात्र, तरीही तो माणूस त्याला मेसेज करून परत कधी येणार हे विचारत राहिला.

Whats_app_banner