Prathamesh Parab Viral Video: मराठी मनोरंजन विश्वातला प्रेक्षकांचा लाडका ‘दगडू’ म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. प्रथमेश परब याने त्याची मैत्रीण क्षितिजा घोसाळकर हिच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अनेक चाहत्यांनी त्यांच्या या फोटो आणि व्हिडीओंवर प्रेमाचा, कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान त्यांच्या लग्नातला आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये प्रथमेश परब याने केलेली कृती पाहून नेटकरी आणि चाहते भारावून गेले आहेत. सगळ्यांनीच त्याच्या या कृतीचे भरभरून कौतुक केले आहे.
अभिनेता प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर यांच्या लग्नात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. गुलाबी आणि पिवळ्या रंगाच्या साडीत क्षितिजाने सात फेरे घेतले. तर, प्रथमेश यानेही तिला मॅचिंग आऊटफिट घातला होता. लग्नाचे सगळे विधी संपूर्ण झाल्यानंतर प्रथमेश परब आपल्या पत्नीच्या म्हणजेच क्षितिजाच्या चक्क पाया पडला. आपल्या घरात येणाऱ्या या लक्ष्मीच्या पावलांचं त्याने केलेलं हे हटके स्वागत पाहून आता नेटकरी देखील भारावून गेले आहेत. प्रथमेश परब याने भर मांडवात पत्नीला दिलेला हा मान पाहून चाहते त्याचे तोंडभरून कौतुक करत आहेत.
प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर यांच्या लग्नाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांनी त्यांच्या या व्हिडीओवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. प्रथमेश आणि क्षितिजा गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. लॉकडाऊन दरम्यान सुरू झालेली त्यांची ही प्रेमकथा आता सुफळ संपूर्ण झाली आहे. प्रथमेश परब याच्या ‘टाईमपास’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान दोघांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात झाली होती. अखेर त्यांनी या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेत चाहत्यांना देखील आश्चर्याचा धक्का दिला होता.
क्षितिजा घोसाळकर आणि प्रथमेश परब यांची पहिली ओळख ही सोशल मीडियावरून झाली होती. क्षितिजाचं लिखाण आवडल्याने प्रथमेश परब याने तिला मेसेज करून याबद्दल कळवलं होतं. यानंतरच दोघांचं बोलणं सुरू झालं. हळूहळू त्यांच्या याच गप्पा मैत्रीपर्यंत पोहोचल्या. दिवसागणिक त्यांची मैत्री अधिकाधिक घट्ट झाली आणि हळूहळू ही मैत्री प्रेमात रुपांतरीत झाली. ‘टाईमपास’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांची पहिली भेट झाली आणि त्यांची प्रेमकथा सुरू झाली.
संबंधित बातम्या