मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  गावखेड्यातील विद्यार्थ्यांसाठी पडद्यावरचा ‘विठ्ठल’ आला धावून! ‘हा’ मराठी अभिनेता बनला ७५ मुलांचा पालक

गावखेड्यातील विद्यार्थ्यांसाठी पडद्यावरचा ‘विठ्ठल’ आला धावून! ‘हा’ मराठी अभिनेता बनला ७५ मुलांचा पालक

Jul 02, 2024 08:56 PM IST

अभिनेत्याच्या'राजे क्लब'च्या वतीने शेवाळवाडी आणि मांजरी परिसरातील ७५ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे.

‘हा’ मराठी अभिनेता बनला ७५ मुलांचा पालक
‘हा’ मराठी अभिनेता बनला ७५ मुलांचा पालक

Actor Nikhil Chavan: कलाकार अनेकदा समाजाचा आरसा म्हणून काम करतात.त्यांची मूल्ये,श्रद्धा आणि संघर्ष त्यांच्या कामातून प्रतिबिंबित करतात. एक चांगला कलाकार आपल्या सभोवतालच्या जगाचा गोंधळ दूर करू शकतो. इतकंच नाही तर, तो समाज प्रबोधनाचं काम देखील करू शकतो. समाजाप्रती दिलगिरी व्यक्त करत ही कलाकार मंडळी जमेल तितकं आणि जमेल त्या पद्धतीने समाजातील गरजूंसाठी मदतीस धावून येतात. अशातच एका मराठमोळ्या आणि प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याने एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ७५ विद्यार्थ्यांच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. हा अभिनेता म्हणजे निखिल चव्हाण. आजवर आपण निखिल चव्हाण याला अनेक चित्रपट आणि मालिकांमधून पाहिले आहे.

आजवर अनेक मालिका,चित्रपटांमधून निखिलने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं.'लागीर झालं जी'या मालिकेमुळे निखिल घराघरांत पोहोचला.'डंका'या आगामी चित्रपटातही निखिल महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातही निखिल पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून, समाजातील नागरिकांना आलेल्या अडचणीवेळी त्यांच्या मदतीला धावून जाताना दिसणार आहे.'डंका'मधून खरा विठ्ठलच त्याच्या भक्तांच्या मदतीला धावून येताना पाहायला मिळणार आहे,असं म्हणणं वावगं ठरणार नाही. चित्रपटातील हा मदतीला धावून जाणारा ‘विठ्ठल’ खऱ्या आयुष्यातही अनेकांच्या उपयोगी पडला आहे.

Viral Video: पुरस्कार सोहळ्यातून केमोसाठी झाली रवाना; कर्करोगाशी लढणाऱ्या हिना खानने शेअर केला भावूक व्हिडीओ

७५ विद्यार्थांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात!

निखिल चव्हाण व अमित अण्णा पवार यांच्या'राजे क्लब'च्या वतीने शेवाळवाडी आणि मांजरी परिसरातील ७५ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. समाजातील काही गरजू लोकांच्या मदतीसाठी हा विठ्ठल खरंच धावून आला आहे. मांजरी आणि शेवाळवाडी परिसरातील अत्यंत गरीब व होतकरु विद्यार्थ्यांचा संपूर्ण वर्षाचा शैक्षणिक खर्च निखिल चव्हाणच्या'राजे क्लब'या संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

यावेळी विद्यार्थ्यांना वर्षभर लागणाऱ्या शालोपयोगी वस्तूंचे वाटपही करण्यात आले. शिवाय त्यांच्या या मदतीचा दर तीन महिन्यांनी आढावाही घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. एक कलाकार असण्याबरोबरच माणुसकी जागवत निखिलने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे. निखिल चव्हाण याने आजपर्यंत अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मात्र, त्याने उचलेलं हे पाऊल आता चर्चेचा विषय ठरलं आहे. सगळेच निखिल चव्हाण याचं तोंड भरून कौतुक करत आहेत.

WhatsApp channel
विभाग