मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kshitij Zarapkar Passed Away: मराठी अभिनेते क्षितिज झारापकर यांचं निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अयशस्वी

Kshitij Zarapkar Passed Away: मराठी अभिनेते क्षितिज झारापकर यांचं निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अयशस्वी

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 05, 2024 02:33 PM IST

Kshitij Zarapkar Passed Away: आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारे, अभिनेते-दिग्दर्शक-लेखक अशी तिहेरी भूमिका चपखलपणे पार पाडणारे क्षितिज झारापकर यांचे निधन झाले आहे.

मराठी अभिनेते क्षितिज झारापकर यांचं निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी
मराठी अभिनेते क्षितिज झारापकर यांचं निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

Kshitij Zarapkar Passed Away: मराठी मनोरंजन विश्वातून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारे, अभिनेते-दिग्दर्शक-लेखक अशी तिहेरी भूमिका चपखलपणे पार पाडणारे क्षितिज झारापकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ५४व्या वर्षी क्षितिज झारापकर यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आज (५ मे) सकाळी दहाच्या सुमारास त्यांनी मुंबईमधील एका खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांचे पार्थिव शिवाजी पार्क येथील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर, साडेतीनच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

गेल्या काही महिन्यांपासून क्षितिज झारपकर यांची कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज सुरू होती. मागील अनेक महिन्यांपासून ते या आजाराशी लढा देत होते. मात्र, आज त्यांची ही झुंज अयशस्वी ठरली आहे. मल्टीपल ऑर्गन डिसऑर्डर झाल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि या दरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्टनुसार क्षितिज झरापकर हे गेल्या अनेक महिन्यांपासून कर्करोगाने ग्रासलेले होते. तसेच, त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. मात्र, या उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

Maharashtrachi Hasyajatra: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ गाजवणाऱ्या ‘या’ अभिनेत्याला तुम्ही ओळखलं का? फोटो व्हायरल

मनोरंजन विश्व गाजवले!

मराठी मनोरंजन विश्वात क्षितिज झारापकर हे नाव फार मोठं होतं. त्यांनी आतापर्यंत ‘गोळा बेरीज’, ‘एकुलती एक’, ‘आयडियाची कल्पना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला होता. त्यांनी मोठा पडदा असो वा रंगभूमी, प्रेक्षकांचं नेहमी भरभरून मनोरंजन केलं. केवळ एक अभिनेता म्हणूनच नव्हते, तर चित्रपट आणि नाटकांचा दिग्दर्शक आणि लेखक म्हणूनही आपलं नाव गाजवलं. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शन आणि लेखन या क्षेत्रातही महत्त्वपूर्ण कामगिरी केली.

कॅन्सरशी झुंज ठरली अयशस्वी

क्षितिज झरापकर यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजन विश्वावर दुःखाची शोककळा पसरली असून, त्यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. मनोरंजन विश्वातून देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. क्षितिज झारापकर हे अनेक दिवसांपासून आजारी होते. तर, अनेक दिवसांपासून एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे. अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री आदिती सारंगधार अभिनित ‘चर्चा तर होणारच’ या नाटकातून ते शेवट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.

IPL_Entry_Point

विभाग