Amey Wagh Viral Video: आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारा मराठमोळा अभिनेता अमेय वाघ सध्या त्याच्या नवनव्या हिंदी प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी'सारख्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अमेय आता हिंदीतही आपलं नाव गाजवत आहे. 'असुर'सारख्या वेब सीरिजमध्ये त्याने अफलातून भूमिका केली आहे. त्याचबरोबर रंगभूमीवर देखील त्याची काही नाटकं खूप गाजत आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणारा अमेय वाघ नेहमीच काहीना काही व्हिडीओ शेअर करून चाहत्यांसोबत कनेक्टेड राहतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या आयुष्यातील अनेक अपडेट्स चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. अमेयच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. नुकताच त्याने एक असा व्हिडीओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर चांगला चर्चेत आला आहे.
या व्हिडीओमध्ये अमेय वाघ अभिनय सोडून चक्क भजनी मंडळीबरोबर भजन करताना दिसला आहे. अमेयने शेअर केलेला हा व्हिडीओ त्याच्या गावातील असून, महाशिवरात्रीच्या पूजेनिमित्त अमेय त्याच्या मूळ गावी पोहोचला होता. महाशिवरात्रीच्या महापूजेदरम्यान अमेयच्या भजन मंडळींचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी अमेय वाघ देखील भजनी मंडळींबरोबर टाळ घेऊन भजन म्हणायला बसला होता. तर, महाशिवरात्रीच्या निमित्ताने निघालेल्या शिव पालखीत देखील त्याने भाग घेतला.
या व्हिडीओमध्ये अमेय वाघ हातात टाळ घेऊन भजन म्हणताना दिसत आहे. तर, खांद्यावर पालखी घेऊन देवाचा जयजयकार करताना देखील दिसला आहे. 'पुरे झाली शहरातल्या मित्रांबरोबर चंगळ... मला सामावून घेतय गावातलं भजनी मंडळ', असं कॅप्शन देत अमेय वाघ याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'हे भोळ्या शंकरा...' हे भजन म्हणताना अमेय वाघ भजनात तल्लीन झालेला दिसला आहे. अमेय वाघचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर आता चाहत्यांच्या देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.
अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत अमेय वाघचं तोंड भरून कौतुक केलं आहे. तुम्ही किती प्रसिद्ध व्हा, पण आपल्या संस्कारांशी आणि आपल्या मातीशी नाळ जोडून ठेवणं हे आपल्याच हातात असतं, आणि तू ते करून दाखवलं आहेस, असे चाहते म्हणत आहेत. 'आयुष्यात कुठेतरी मानसिक शांतता मिळावी म्हणून खरंच हे गरजेचे आहे', 'तर किती एका सुरात गातायत ही भजनी मंडळी', असं म्हणत चाहत्यांनी या व्हिडीओचं कौतुक केलं आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
संबंधित बातम्या