मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aastad Kale: अभिनेता आस्ताद काळेला मातृशोक! पोस्ट शेअर करत झाला भावूक

Aastad Kale: अभिनेता आस्ताद काळेला मातृशोक! पोस्ट शेअर करत झाला भावूक

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 31, 2023 02:09 PM IST

Marathi Actor Aastad Kale: मराठमोळा अभिनेता अस्ताद काळेच्या आईचे निधन झाले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने व्यक्त केला शोक

Aastad Kale
Aastad Kale

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि सर्वांचा आवडता अभिनेता अस्ताद काळेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आईचे निधन झाले आहे. अस्तादने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. अनेकांनी त्यावर कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काही दिवसांपुर्वी आस्तादच्या आईने अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनाने आस्ताद खूपच भावूक आणि दु:खी झाला आहे. आस्तादने सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत चाहत्यांना ही बातमी दिली आहे. त्याने सलग काही भावूक पोस्ट शेअर केल्या आहेत. पण अस्तादच्या आईचे निधन का झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आस्ताद आणि त्याच्या आईचे खुप घट्ट नाते होते. आस्ताद त्याचे पुर्ण नाव लिहितांनाही आईचे नाव लावतो.
वाचा: व्हायरल झालेल्या बोल्ड सीनवर प्रियाच्या वडिलांची प्रतिक्रिया कशी होती?

अस्तादने फेसबुकवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. एका पोस्टमध्ये अस्तादने "ती गेली… तेव्हा…" असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये "…म्हणुनी …घनव्याकुळ मी रडलो नाहीये अजून" असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर अस्तादच्या या दोन्ही पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.

अनेक कलाकारांनी तसेच चाहत्यांनी अस्तादच्या या पोस्टवर कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच त्याला खचून जाऊ नकोस, प्रत्येकाला कठीण काळातून जावे लागते अशा भाषेत धीर दिला आहे.

WhatsApp channel
विभाग