'लगे रहो मुन्नाभाई' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे संजय दत्त. आजवर संजय दत्तने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या अनेक भूमिका हिट ठरल्या होत्या. संजय दत्तच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. पण त्याचे मन जिंकले ते मान्यता दत्तने. मान्यती ही संजय दत्तची दुसरी पत्नी आहे. आज २९ जुलै रोजी मान्यताचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...
'ए मामू' म्हणत प्रेक्षकांच्या मने जिंकणारा अभिनेता संजय दत्तने मान्यता दत्तशी दुसरे लग्न केले आहे. मात्र, एकेकाळी त्याच्या लग्नामुळे बहिण प्रिया दत्त नाखूश होती. तिने मान्यतावर अनेक गंभीर आरोप केले होते. “या बाईने माझ्या भावाला फसवलं" असे प्रिया म्हणाली होती.
सुनील दत्त आणि नर्गिस यांना तीन मुले. संजय दत्त, प्रिया दत्त आणि नम्रता दत्त अशी तिघांची नावे. सुनील दत्त आणि नर्गिस यांचे त्यांच्या सर्व मुलांवर खूप प्रेम होते. परंतु नर्गिस नंतर सुनील दत्त यांचे निधन झाले आणि त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टीवरून भावंडांमध्ये मतभेद होत गेले. संजय दत्तपेक्षा १९ वर्षांनी लहान असलेल्या प्रिया दत्तने २००९ मध्ये मान्यता दत्तवर अनेक आरोप केले होते. तिचा अपमान केला होता. प्रिया म्हणाली होती, "मान्यता संजयची पत्नी नाही किंवा ती सुनील आणि नर्गिस दत्तची सून नाही. या बाईने माझ्या भावाला जाळ्यात अडकवले आहे."
संजय दत्तला जेव्हा हे कळाले तेव्हा त्याला प्रचंड राग आला होता. त्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, 'प्रिया कुटुंबातील मोठी सदस्य असल्याने त्याने आणि मान्यताने तिला माफ केले आहे. मान्यता ही नर्गिस आणि सुनील दत्त यांची सूनच आहे, यात काही शंका नाही.'
प्रियासोबतच संजयची दुसरी बहिण नम्रताचा देखील संजयच्या लग्नाला विरोध होता. पण तिने कधीही जाहीरपणे काहीच सांगितले नाही. संजय दत्तने नाराज होऊन प्रियाच्या आडनावावर खोचक टीका केली होती. त्यावेळी तो म्हणाला होता की, "लग्नानतंर प्रिया दत्तने तिच्या सासू-सासऱ्यांचे आडनाव आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजेत."
'थानेदार' चित्रपट करत असतान संजय दत्त माधुरीच्या सौंदर्यावर फिदा झाला होता. पण १९९३ साली संजय दत्तच्या आयुष्यात मोठे वादळ आले. त्याला अटक झाली होती. संजय दत्त तुरुंगात असताना माधुरी त्याला एकदाही भेटायला गेली नाही. याच काळात संजय दत्तच्या पहिल्या पत्नीचे निधन देखील झाले. दरम्यान, संजयला भेटण्यासाठी मॉडेल रिया पल्लई तुरुंगात जायची. एका मंदिरात जाऊन संजय दत्तने तिच्याशी लग्न केले होते. पण नंतर संजय दत्त नाडिया दुरानीच्या प्रेमात पडला. त्यामुळे संजय दत्तची दुसरी पत्नी त्याच्यापासून विभक्त झाली.
वाचा: मनोज बाजपेयीचा 'भैय्या जी' ओटीटीवर रिलीज होणार, जाणून घ्या कधी आणि कुठे
संजय परत एकटा पडला होता. त्यानंतर संजय दत्तचा एका मुलीसोबतचा व्हिडीओ समोर आला होता. पण त्यामध्ये त्या मुलीचा चेहरा नीट दिसत नव्हता. स्टार स्क्रीन अवॉर्डमध्ये संजय दत्त याच मुलीला म्हणजे मान्यताला घेऊन गेला होता. त्यावेळी त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. नोव्हेंबर २००६मध्ये संजय दत्त आणि मान्यताने लग्न केल्याचे समोर आले होते. मान्यताने काही बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले.
संबंधित बातम्या