मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची संघर्षकथा मोठ्या पडद्यावर झळकणार! अभिनेत्याचा लूक बघाच

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची संघर्षकथा मोठ्या पडद्यावर झळकणार! अभिनेत्याचा लूक बघाच

Jan 20, 2024 03:24 PM IST

Manoj Jarange Patil Biopic: मराठा समाजासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांचा संघर्षमय प्रवास आता मोठ्या पडद्यावर देखील पाहायला मिळणार आहे.

Manoj Jarange Patil Boipic
Manoj Jarange Patil Boipic

Manoj Jarange Patil Biopic: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यातील हा प्रवास आता मोठ्या पडद्यावर देखील पाहायला मिळणार आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, 'संघर्षयोद्धा' असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू झाले आहे. या खास प्रसंगी स्वतः मनोज जरांगे पाटील, निर्माते, दिग्दर्शक आणि टीम आवर्जून उपस्थित होती. येत्या २६ एप्रिल २०२४ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ‘मराठा आंदोलना’ची ज्योत पेटवली आहे. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने असलेला मराठा समाज आर्थिक सक्षमते अभावी शिक्षण, रोजगारात मागे पडत असल्याने या समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. याच मागणीसाठी ‘एक मराठा, लाख मराठा’ म्हणत २०१६मध्ये राज्यभर भव्य मोर्चे निघाले होते. त्यानंतर राज्य सरकारने दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. याच संघर्षात योद्धा म्हणून उतरणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक हालचालीने मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने एक पाऊल पुढे टाकले.

Shreyas Talpade: सई ताम्हणकरसोबत जुळली श्रेयस तळपदेची जोडी! ‘श्रीदेवी प्रसन्न’च्या गाण्यात दिसले एकत्र

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आघाडीवर लढणारे मनोज जरांगे पाटील हे स्वतः अंतरवाली सराटी या गावातील आहेत. आंदोलन, उपोषणे करून त्यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून तुफान पाठिंबा मिळत आहे. अत़्यंत साध्या अशा या कार्यकर्त्याचा जीवनपट आणि आरक्षणासाठीचा संघर्ष समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच लोकांमध्ये या चित्रपटाची खूपच उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वसामान्य मराठा तरुणांमधून उभ्या राहिलेल़्या नेतृत्वाचं चित्रण लोकांसमोर आता लवकरच येणार आहे.

सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारत असलेले रोहन पाटील, अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख हे देखील उपस्थित होते. गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मितीची बाजू सांभाळली आहे. सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद केले आहे, तर शिवाजी दोलताडे दिग्दर्शनाची जबाबदारी निभावत आहेत. चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४