मनोज वाजपेयी हिंदू आणि पत्नी मुस्लीम; मुलीने तिचा धर्म विचारताच मिळाले 'हे' उत्तर
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मनोज वाजपेयी हिंदू आणि पत्नी मुस्लीम; मुलीने तिचा धर्म विचारताच मिळाले 'हे' उत्तर

मनोज वाजपेयी हिंदू आणि पत्नी मुस्लीम; मुलीने तिचा धर्म विचारताच मिळाले 'हे' उत्तर

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 13, 2024 05:15 PM IST

मनोज वाजपेयीने एका मुलाखतीमध्ये सांगितले की त्यांच्या घरात धर्मावरुन कधीही अडचण आली नाही. इतकंच नाही तर वडिलांचं निधन झालं तेव्हा हिंदूंपेक्षा जास्त मुस्लीम आले होते, असं ही त्याने सांगितलं.

मनोज बाजपेयी
मनोज बाजपेयी

बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांच्या यादीमधील एक नाव म्हणजे मनोज वाजपेयी. त्यांची प्रत्येक भूमिका ही काही तरी हटके असते. त्यामुळे मनोज यांच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रेम केले आहे. मनोज हे कायम त्यांच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. मनोज हे हिंदू आहेत, तर त्यांची पत्नी ही मुस्लीम आहे. एकदा त्यांच्या मुलीने आई-वडीलांचा धर्म जाणून घेऊन तिचा धर्म कोणता असा प्रश्न मनोज यांना केला होता. आता मनोज यांनी लेकीला नेमकं काय उत्तर दिलं चला जाणून घेऊया...

मनोज यांनी २००६मध्ये शबाना रझासोबत लग्न केले होते. दोघांचेही धर्म वेगवेगळे होते, पण यामुळे त्यांच्या नात्यात कधीही दुरावा निर्माण झाला नाही. मनोज यांनी सांगितले की त्यांचे वडील कधी त्यांच्या या नात्याच्या विरोधात गेले नाहीत. तसेच अभिनेत्याने असेही सांगितले की तो आपल्या मुलीला आयुष्यात स्वत:चे निर्णय स्वत: घेण्यास शिकवत आहे.

कुटुंबीयांना दोघांविषयी कळताच काय होती प्रतिक्रिया

मनोज वाजपेयी यांनी नुकतीच बरखा दत्तला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी खासगी आयुष्यावर वक्तव्य केले. मनोज आणि त्यांची पत्नी हे दोघेही एकमेकांच्या धर्माचा आदर करतात आणि त्याबद्दल घरात कधीच अडचण येत नाही. लग्नाविषयी मनोज म्हणाले की, 'हे खूप सोपं होतं आणि मलाही आश्चर्य वाटलं. जेव्हा मी माझ्या घरच्यांना आमच्या नात्याविषयी सांगितले तेव्हा त्यांना काहीच वाटले नाही.' या मुलाखतीमध्ये मनोज पुढे म्हणाले, 'माझे वडील खूप चांगला माणूस होता. त्याचे अनेक मुस्लीम मित्र होते. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्याच्या मृत्यूला हिंदूंपेक्षा जास्त मुस्लिम आले होते. अशाप्रकारे माझे संगोपन झाले आहे.'
वाचा: अभिनेत्री नग्न अवस्थेत व्ही. शांताराम यांच्यासमोर उभी राहिली आणि मग...

मुलीने विचारला प्रश्न

मनोज म्हणाले, 'आम्हाला ते हाताळण्याची गरज नाही. भांडण होत नाही. आपल्या सगळ्यांची आपापली जागा आहे. माझ्या मुलीने मला सांगितले की तिच्या मैत्रिणींच्या घरी धर्माबद्दल बोलले जाते आणि एके दिवशी तिने आईला माझा धर्म काय आहे असे विचारले तर माझी पत्नी म्हणाली की तू स्वत: ठरव. तुला कोणता धर्म जास्त जवळचा वाटत आहे.' मनोज यांनी मुलाखतीमध्ये शेवटी सांगितले की, तो दररोज प्रार्थना करतो आणि त्याची पत्नी तिचा धर्म पाळते. आवा कधी नतमस्तक होते, तर कधी नाही. त्यावर आम्ही प्रश्नही विचारत नाही.

Whats_app_banner