मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sirf Ek Bandaa Kaafi Hai: मनोज बाजपेयीचा चित्रपट म्हणजे मास्टरपीस! पाहा प्रेक्षकांना कसा वाटला ‘सिर्फ एक बंदा काफी है..’
Sirf Ek Bandaa Kaafi Hai
Sirf Ek Bandaa Kaafi Hai

Sirf Ek Bandaa Kaafi Hai: मनोज बाजपेयीचा चित्रपट म्हणजे मास्टरपीस! पाहा प्रेक्षकांना कसा वाटला ‘सिर्फ एक बंदा काफी है..’

24 May 2023, 12:31 ISTHarshada Bhirvandekar

Sirf Ek Bandaa Kaafi Hai Twitter Review: मनोज बायपेयी याचा हा चित्रपट ट्विटरवर ट्रेंड करत आहे. नेटकऱ्यांना देखील हा चित्रपट प्रचंड आवडला असून, अनेक लोक एकमेकांना हा चित्रपट पाहण्याचा सल्ला देत आहेत.

Sirf Ek Bandaa Kaafi Hai Twitter Review: बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. त्याच्या नव्या चित्रपटांची चाहते नेहमीच आतुरतेने वाट बघत असतात. नुकताच त्याचा 'सिर्फ एक बंदा काफी है' हा चित्रपट ‘झी५’वर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. मनोज बाजपेयीचा हा नवा चित्रपट पाहणारा प्रत्येक प्रेक्षक त्याचे तोंडभरून कौतुक करत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मनोज बायपेयी याचा हा चित्रपट ट्विटरवर ट्रेंड करत आहे. नेटकऱ्यांना देखील हा चित्रपट प्रचंड आवडला असून, अनेक लोक एकमेकांना हा चित्रपट पाहण्याचा सल्ला देत आहेत. या चित्रपटावर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांनी मनोज बाजपेयीच्या या चित्रपटाचे 'मस्ट वॉच' चित्रपट म्हणत कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले की, ‘पुन्हा एकदा तुम्ही #सिर्फ_एक_बंद_काफी_है मधील तुमच्या अप्रतिम अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत, मनोज बाजपेयी लव्ह यू सर! अप्रतिम अभिनय.’

एका युजरने लिहिले की, ‘आपण सगळ्यांनीच 'सिर्फ एक बंदा काफी है' चित्रपटाला पाठिंबा दिला पाहिजे आणि अंध भक्तीची साखळी तोडली पाहिजे.’ मनोज बाजपेयी याच्या या चित्रपटात सत्य दाखवण्यात आल्याचे सोशल मीडिया युजर्सचे मत आहे. अशा चित्रपटांना प्रोत्साहन दिले पाहिजे. जेणेकरून सत्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, असे ते म्हणत आहेत. आणखी एका युजरने लिहिले की, ‘आसाराम बापू हा गुन्हेगार आहे आणि त्याचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला आहे. 'सिर्फ एक बंदा काफी है' मध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला त्याच्या चुकीची कठोर शिक्षा द्यायला हवी.’

अपूर्व सिंह कार्की दिग्दर्शित, 'सिर्फ एक बंदा काफी है' या चित्रपटामध्ये मनोज बाजपेयीने पीसी सोलंकीची भूमिका केली आहे, ज्यांनी अल्पवयीन मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर लढा दिला. या चित्रपटात दाखवण्यात आले आहे की, एका अध्यात्मिक गुरुवर अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप आहे आणि त्याला पोक्सो कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. यानंतर मनोज बाजपेयीने साकारलेले पात्र, कोर्टात या मुलीसाठी लढतो आणि प्रक्रियेत त्याला खूप त्रास सहन करावा लागतो.

विभाग