मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  कधी एसीपी तर कधी फॅमिली मॅन; ओटीटीवर नक्की पाहा मनोज बाजपेयी याचे हे धमाकेदार चित्रपट

कधी एसीपी तर कधी फॅमिली मॅन; ओटीटीवर नक्की पाहा मनोज बाजपेयी याचे हे धमाकेदार चित्रपट

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 23, 2024 07:25 AM IST

आज २३ एप्रिल रोजी मनोज बाजपेयी याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्या काही चित्रपटांविषयी. काही चित्रपटांमध्ये त्याने एसीपी तर काही फॅमिली मॅन अशा भूमिका साकारल्या आहेत.

कधी एसीपी तर कधी फॅमिली मॅन; ओटीटीवर नक्की पाहा मनोज बाजपेयीचे हे धमाकेदार चित्रपट
कधी एसीपी तर कधी फॅमिली मॅन; ओटीटीवर नक्की पाहा मनोज बाजपेयीचे हे धमाकेदार चित्रपट

अभिनयाचा बादशाह म्हणून बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी ओळखला जातो. कॉमेडी असो वा थ्रिलर स्टोरी मनोज बाजपेयीने प्रत्येक भूमिका अतिशय योग्य पद्धतीने वठवली आहे. बिहारमध्ये नाटकांमध्ये काम केल्यानंतर मायानगरीमध्ये स्वत:ची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आलेल्या मनोज बाजपेयीने कधीही मागे वळून पाहिले नाही. त्याचा प्रत्येक चित्रपट हिट जवळपास हिट ठरला. आज २३ एप्रिल रोजी मनोजचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी...

ट्रेंडिंग न्यूज

मनोज बाजपेयीचा जन्म २३ एप्रिल १९६९ रोजी बिहारच्या पश्चिम चंपारणमधील बेलवा या गावात झाला. मनोजचे वडील शेती करायचे. मनोजने १२वी पर्यंतचे शिक्षण बिहारमधून झाले आणि त्यानंतर वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी अभिनेता बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो बिहारमधून बाहेर पडला. त्याने दिल्लीमध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तीन वेळा प्रयत्न केला. मात्र, तीनही वेळा त्याला नकाराचा सामना करावा लागला. या सगळ्याचा त्याच्यावर इतका परिणाम झालेला की त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नंतर हळूहळू त्याला कामे मिळू लागली. 'सत्या' चित्रपटाने त्याच्या करिअरला एक वेगळी दिशा मिळाली. चला पाहूया मनोजचे ओटीटीवरील काही खास चित्रपट...
वाचा: अंगावर शहारे आणणारा अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ, 'कल्की 2898 एडी' सिनेमातील अश्वत्थामाचा लूक चर्चेत

सायलेंस २

२०२१मध्ये प्रदर्शित झालेला सायलेंस: कॅन यू हीअर ईट या चित्रपटाच्या शेवटची आरोपीची एक झलक पाहायला मिळाली होती. आता याच्या दुसऱ्या भागात चित्रपटाची कथा ही एका पिडीत व्यक्तीने सुरु होते. या व्यक्तीच्या हातात काही फोटो आहेत आणि त्याला काही गुपित कळाले आहे. हे रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी एसीपी अविनाश वर्मा यांची पोस्टिंग करण्यात आलेली असते. एसीपीची भूमिका मनोज साकारताना दिसत आहे. हा चित्रपट झी ५ या ओटीटीवर पाहायला मिळत आहे.

जोरम

जोरम या चित्रपटात एक सर्वायकल थ्रिलर स्टोरी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात मनोजने बिहारमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीची भूमिका साकारली आहे. ही व्यक्ती त्याच्या नवजात मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतो. या व्यक्तीवर पत्नीच्या हत्येचा आरोप करण्यात आलेला असतो. मुलाचा जीव वाचवा यासाठी संपूर्ण सरकारशी लढत असतो. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटीवर पाहाता येणार आहे.
वाचा: रंगभूमीवर एक अनोखा प्रयोग! पहिल्या मराठी AI महाबालनाटकामध्ये 'ही' अभिनेत्री करणार काम

सिर्फ एक बंदा काफी है

न्याय, धाडस आणि सत्य यावर आधारित असलेला हा चित्रपट झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात मनोजने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे.

द फॅमिली मॅन

मनोज बाजपेयीच्या उत्कृष्ट कामापैकी एक 'द फॅमिली मॅन' ही सीरिज आहे. या सीरिजमधील त्याची श्रीकांत तिवारी ही भूमिका विशेष गाजली आहे. ही सीरिज अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे.
वाचा: मृण्मयी आणि गौतमी देशपांडेचा चिन्मय मांडलेकर याला पाठिंबा, सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

गुलमोहर

गुलमोहर हा चित्रपट एक टॉप क्लास ड्रामा आहे. या चित्रपटात एका दु:खी वडिलांचा सांभाळ करणाऱ्या पती आणि त्याच्या मुलाची कथा आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली बत्रा परिवाराची कथा अतिशय हृदयस्पर्शी आहे.

IPL_Entry_Point

विभाग