मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Killer Soup: कोंकणा सेनसोबतच्या किसिंग सीनवर काय होती मनोज बाजपेयीच्या पत्नीची प्रतिकिया?

Killer Soup: कोंकणा सेनसोबतच्या किसिंग सीनवर काय होती मनोज बाजपेयीच्या पत्नीची प्रतिकिया?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 07, 2024 10:21 AM IST

Manoj Bajpayee kissing scene: मनोज बाजपेयी आणि कोंकणा सेन शर्मा या दोघांनी 'किलर सूप' या वेब सीरिजमध्ये एका कपलची भूमिका साकारली आहे. या सीरिजमध्ये दोघांनी काही इंटिमेट सीन्सही दिले आहेत.

Manoj Bajpayee kissing scene
Manoj Bajpayee kissing scene

Manoj Bajpayee kissing scene: बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी याच्यासाठी गेलं वर्ष अर्थात २०२३ हे वर्ष फार छान गेलं आहे. २०२३मध्ये त्याचे तीन चित्रपट 'गुलमोहर', 'सिर्फ एक बंदा काफी है' आणि 'जोराम' प्रदर्शित झाले होते. समीक्षकांनी या तिन्ही चित्रपटांचे खूप कौतुक केले होते. आता त्याच्या नव्या वर्षाची सुरुवात देखील धमाकेदार झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच मनोज बाजपेयी नेटफ्लिक्सच्या 'किलर सूप' या वेब सीरिजमध्ये दिसला आहे. या डार्क कॉमेडी क्राईम थ्रिलरमध्ये मनोज बाजपेयीसोबत कोंकणा सेन शर्मा मुख्य भूमिकेत आहे. या वेब सीरिजचे दिग्दर्शन अभिषेक चौबे यांनी केले आहे. मनोज बाजपेयी या सीरिजसाठी खूप उत्सुक आहे.

मनोज बाजपेयी आणि कोंकणा सेन शर्मा या दोघांनी या वेब सीरिजमध्ये एका कपलची भूमिका साकारली आहे. या सीरिजमध्ये दोघांनी काही इंटिमेट सीन्सही दिले आहेत. या सीन्सवर मानोन बाजपेयी यांच्या पत्नीची काय प्रतिक्रिया होती, याविषयी अभिनेत्याने सांगितलं आहे. या चित्रपटातील किसिंग सीनवर पत्नीची प्रतिक्रिया काय होती, हे सांगताना मनोज बाजपेयी म्हणाला की, 'मी माझ्या सहकलाकारांना याआधी कधी किस केले नव्हते का? मी अनेक चित्रपटांमध्ये किसिंग सीन दिला आहे. आता देखील माझ्या पत्नीने ही संपूर्ण वेब सीरिज पाहिली. तिला आधीच माहीत होतं की, यात माझ्यात आणि कोंकणामध्ये एक किसिंग सीन आहे. त्यामुळे तिची प्रतिक्रिया ही सामान्य प्रेक्षकाप्रमाणेच होती. मुळात मुद्दा असा आहे की, ही दृश्ये कथानकाच्या दृष्टीने महत्त्वाची होती. जग चंद्रावर पोहोचले आहे आणि आपण भारतीय लोक अजून किसिंग सीनबद्दल का बोलत आहोत?'

अभिनेता मनोज बाजपेयी पुढे म्हणाला की, 'मी नेहमीच माझे बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. मी जेव्हा एखादा चित्रपट स्वीकारतो, तेव्हा मी माझी भूमिका खूप उत्कटतेने करतो. आता आशा आहे की, प्रेक्षकांच्या २०२४ची सुरुवात ‘किलर सूप’सह धमाकेदार होईल. यानंतर माझ्या प्रॉडक्शनचा ‘भैय्याजी’ हा चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. मी या चित्रपटाची सहनिर्मिती करत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अपूर्व सिंग कार्की आहेत, ज्यांनी ‘सिर्फ एक बंदा काफी है’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मला भावाचा अभिमान आहे. माझ्या कामगिरीबाबत तुमच्या अपेक्षा उंच ठेवा. माझ्या स्वतःकडून खूप अपेक्षा आहेत.'

WhatsApp channel

विभाग