बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयीचा 'भैय्या जी' हा चित्रपट यावर्षी मे महिन्यात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट मनोज बाजपेयीच्या कारकिर्दीतील सर्वात महत्वाचा चित्रपट आहे. कारण हा चित्रपट मनोज बाजपेयीच्या कारकिर्दीतील १०० वा चित्रपट आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्हाला हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता आला नसेल तर आता तुम्ही मनोज बाजपेयीचा हा चित्रपट आरामात घरी बसून पाहू शकता...
मनोज बाजपेयीचा 'भैय्या जी' हा चित्रपट झी ५ या ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २६ जुलै रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती झी ५ ओटीटी प्लॅटफॉर्मच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे देण्यात आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी "रॉबिन हूडचे वडील नॉट रॉबिन हूड. ते विध्वंस घडवायला येत आहेत भाऊ. हा चित्रपट तुम्ही २६ जुलैपासून झी ५ वर पाहू शकता" असे म्हटले आहे.
'भैय्या जी' चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख जाहीर होताच चाहते उत्सुक आहेत. चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये आपला आनंद व्यक्त केला आहे. एका युजरने 'भैय्या जी सुपरहिरो' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'भैय्याजींचा भाग २ यावा किंवा त्यानंतरची कथा किंवा त्याआधीची कथा बाजपेयी जी' अशी कमेंट केली आहे. इतरही काही यूजर्सने यावर कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे.
वाचा : 'धर्मवीर २' चित्रपटामध्ये धुरळाच उडणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पडद्यावर झळकणार?
मनोज बाजपेयीच्या 'भैय्या जी' या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व सिंग कार्की यांनी केले आहे. मनोज बाजपेयी यांच्या 'सिर्फ एक बंदा इनफ है' या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. तर चित्रपटाची कथा दीपक राजाराणी यांनी लिहिली आहे. मनोज बाजपेयीव्यतिरिक्त सुविंदर विकी, जतिन गोस्वामी, विपिन शर्मा आणि झोया हुसेन हे कलाकार या चित्रपटात दिसत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ११.५२ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट २४ मे २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. आता झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चाहते २६ जुलैची वाट पाहाताना आता दिसत आहेत.
संबंधित बातम्या