मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मल्लिकाजान मनीषा कोईरालाकडून सोनाक्षी सिन्हाला मिळाले मोठे गिफ्ट, जाणून घ्या काय मिळाले

मल्लिकाजान मनीषा कोईरालाकडून सोनाक्षी सिन्हाला मिळाले मोठे गिफ्ट, जाणून घ्या काय मिळाले

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 23, 2024 09:46 AM IST

अभिनेत्री मनीषा कोईरालाने सोनाक्षी सिन्हाला तिच्या घरी भेट वस्तू पाठवली आहे. आता ही भेटवस्तू काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

sonakshi manisha: मनीषा कोईरालाकडून सोनाक्षी सिन्हाला खास गिफ्ट
sonakshi manisha: मनीषा कोईरालाकडून सोनाक्षी सिन्हाला खास गिफ्ट

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोनाक्षी तिची कथित बॉयफ्रेंड जहीर इक्बालशी लग्न करणार आहे. त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. आज सोनाक्षी रजिस्टर पद्धतीने लग्न करणार आहे. तसेच संध्याकाळी त्यांचे ग्रँड रिसेप्शन आयोजित करण्यात आहे. चाहते सोनाक्षीला वधूच्या लूकमध्ये पाहण्यासाठी आतुर आहेत. अशातच अभिनेत्री मनीषा कोईरालाने सोनाक्षीला लग्नाची भेट ही तिच्या घरी पाठवली आहे. आता ही भेट काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

मनीषाने काय भेट पाठवली

मनीषा आणि सोनाक्षी यांनी संजय लीला भन्साळी यांची नुकतीच प्रदर्शित झालेली वेब सीरिज 'हिरामंडी'मध्ये एकत्र काम केले आहे. आता जेव्हा सोनाक्षी लग्न करत आहे हे जेव्हा मल्लिकाजन उर्फ मनाषीला कळाले तेव्हा तिने त्याच्या फरीदानसाठी खास भेट पाठवली आहे. ही भेट पाठवल्यानंतरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सोनाक्षीच्या घरी भेटवस्तू घेऊन आल्याचे दिसत आहे. एक मोठा बॉक्स आणि सोबतच सुंदर फुले मनीषाने पाठवली आहे.
वाचा: 'रेखाकडे असे काय आहे जे माझ्याकडे नाही', शबाना आझमी यांनी दिग्दर्शकाला विचारला होता प्रश्न

सोनाक्षी आणि मनीषाचा बाँड

सोनाक्षी सिन्हा नुकतीच संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडी या वेब सीरिजमध्ये मनीषा कोईरालासोबत दिसली होती. अनेक मुलाखती आणि प्रमोशनदरम्यान या दोन्ही अभिनेत्रींमध्ये जबरदस्त बॉन्डिंग पाहायला मिळाले. अशातच सोनाक्षीच्या सर्वात खास दिवशी मनीषाने तिच्यासाठी एक खास गिफ्ट पाठवले, जे गिफ्ट रॅपमध्ये पॅक करण्यात आले आहे. पाहा गिफ्टचा हा व्हिडिओ:
वाचा: पाच जन्मातील बायका एकाच जन्मात! स्वप्नील जोशीच्या 'बाई गं'चा टीझर चर्चेत

ट्रेंडिंग न्यूज

हिरामंडीमधील कलाकार राहणार हजर

सोनाक्षीने तिच्या लग्नात काही मोजक्याच लोकांना आमंत्रित केल्याची माहिती आहे. पण तिने हीरामंडी सीरिजमधील सगळ्या कलाकारांना निमंत्रण पाठवले असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे सोनाक्षीच्या लग्नात हिरामंडीचे कलाकार एकत्र दिसू शकतात. तसेच चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटीही या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. याशिवाय सोनाक्षीची मैत्रीण हुमा कुरेशी तिचा भाऊ साकिब सलीमसोबत घरी पोहोचली आहे.
वाचा: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील कलाकाराचा १६ वर्षांनी मालिकेला रामराम, चाहत्याची पोस्ट

सोनाक्षीच्या लग्नाविषयी

सोनाक्षी सिन्हाचे भावी सासरे रतनसी इक्बाल यांनी लग्नावर मोकळेपणाने भाष्य केले आहे. पफरी प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, झहीर आणि सोनाक्षी हिंदू किंवा मुस्लिम रीतीरिवाजानुसार नव्हे तर कागदावर स्वाक्षरी करून लग्न करत आहेत. म्हणजेच वांद्रे येथील अभिनेत्याच्या घरी नोंदणीकृत विवाह सोहळा पार पडणार आहे. संध्याकाळी त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन ठेवण्यात आले आहे.

WhatsApp channel