Mangla Teaser Out : शिवाली परबनं केली कमाल! नशीब बदलणाऱ्या 'मंगला'चा टीझर पाहून तुम्हीही कराल कौतुक
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mangla Teaser Out : शिवाली परबनं केली कमाल! नशीब बदलणाऱ्या 'मंगला'चा टीझर पाहून तुम्हीही कराल कौतुक

Mangla Teaser Out : शिवाली परबनं केली कमाल! नशीब बदलणाऱ्या 'मंगला'चा टीझर पाहून तुम्हीही कराल कौतुक

Dec 09, 2024 10:56 AM IST

Mangla Marathi Movie Teaser Out : 'मंगला' चित्रपटाच्या टीझरने चित्रपटातील रहस्य ताणून ठेवले आहे. ऍसिड हल्ल्याने वाईट वेळ आलेल्या एका गायिकेचा खराखुऱ्या प्रवासाची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय.

Mangla Marathi Movie Teaser
Mangla Marathi Movie Teaser

Mangla Marathi Movie Teaser : जर्मन तत्वज्ञ फ्रेडरिक यांनी 'देव मेलाय' असे वादग्रस्त विधान केलं होतं, हो पण या विधानाला अनेकांनी खोडून काढत प्रचितीची अनेक उदाहरण जगासमोर दाखल केली. नशिबाच्या गोष्टी, नियतीने आखलेले खेळ या सगळ्यांतून जात प्रत्येकजण काही ना काही शिकत असतो. आयुष्यात आलेल्या अनेक संकटांचा निडरपणे सामना करण्याचं धैर्य हा देवचं देतो, त्यामुळे जर्मन तत्वज्ञने केलेलं हे विधान अर्थात चुकीचं म्हणावं लागेल. ती लढाई, ती जिद्द, तो खेळ या सगळ्याचा पलिकडे जात जन्मा- मरणाच्या गोष्टींची अभूतपूर्व कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हो कारण बरेच दिवसांपासून चर्चेत असणारा 'मंगला' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

'मंगला' चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. टीझरमध्ये शिवाली परबसह शशांक शेंडे, अलका कुबल, डॉ. संजीव कुमार पाटील, विशाल राठोड या कलाकारांचा अभिनय लक्षवेधी ठरत आहे.

Dia Mirza Birthday : 'रहना है तेरे दिल में'मधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी दिया मिर्झा सध्या काय करते?

टीझरमध्ये काय पाहायला मिळतंय?

'मंगला' चित्रपटाच्या टीझरने चित्रपटातील रहस्य ताणून ठेवले आहे. ऍसिड हल्ल्याने वाईट वेळ आलेल्या एका गायिकेचा खराखुऱ्या प्रवासाची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय. एखाद्याच्या रूपाबरोबर त्यांच्यातील कलेला पुढे जाऊ न देता वाईट सूड घेऊन काही राक्षसी लोकं या चांगल्या कलेला त्रास देतात, हे चित्रपटात पाहायला मिळतेय. मात्र शेवटी विजय हा नेहमीच सत्याचा होतो असं म्हणतात, त्याप्रमाणे खरंच या हल्ल्यातुन त्या गायिकेचा विजय होईल का हे चित्रपट पाहिल्यावरचं कळेल. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर व संगीत अनावरण सोहळा दणक्यात पार पडला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

कधी रिलीज होणार चित्रपट?

'मंगला' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अपर्णा हॉशिंग यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू अपर्णा हॉशिंग, यशना मुरली, मोहन पुजारी, मिलिंद फोडकर यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा सौरभ चौधरीची असून, संवाद प्रथमेश शिवलकर याचे आहेत. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत शंतनु घटक याचे आहे. तर चित्रपटातील गाणी निहार शेंबेकर, रोंकिनी गुप्ता, स्नेहल मालगुंडकर या गायकांनी त्यांच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केली आहेत. एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून शिवाली परबला मोठ्या पडद्यावर पाहणं उत्सुकतेचं ठरेल. ‘मंगला’ची ही खरीखुरी कथा १७ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरेल.

Whats_app_banner