Mangla Marathi Movie Teaser Out : 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' या वाक्याचा गूढ अर्थ अनेकांना माहीत आहे. परंतु, जन्माच्या वेळीच मरणाच्या चक्रात अडकलेल्यांच्या जीवनावर तशी चर्चा कमी होते.'मंगला' या चित्रपटात या गूढतेची एक अभूतपूर्व कथा उलगडली आहे, ज्यात एक तरुण गायिका ऍसिड हल्ल्याचा बळी बनते. या चित्रपटामुळे नशिबाच्या चक्राविरुद्ध लढण्याच्या जिद्दी स्त्रीच्या आयुष्याची गूढ कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.
या चित्रपटाच्या टीझरने सगळ्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. या टीझरमध्ये गायिकेच्या आयुष्यातील या कठीण काळाचे दर्शन झाल्यावर, प्रेक्षकांना आता या हल्ल्याचे कारण, हल्ला कोणी केला, आणि त्या संकटावर मात करण्याची मंगलाची लढाई या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्याची उत्सुकता लागली आहे. टीझरमधील या चित्रणामुळे प्रेक्षकांच्या मनात या कथेसंबंधी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
'मंगला' हा चित्रपट १७ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या कथेचा केंद्रबिंदू आहे मंगलाची लढाई.'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री शिवाली परब या चित्रपटात मंगलाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या धमाकेदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या चित्रपटाच्या टीझरमध्ये मंगलाच्या चेहऱ्यावर झालेल्या हल्ल्याची जखम पहिल्यावर तिची कथा किती गहन आहे, याचा साक्षात्कार होतो.
‘मंगला’ याचित्रपटाच्या निर्मितीची धुरा अपर्णा हॉशिंग, यशना मुरली, मोहन पुजारी, आणि मिलिंद फोडकर यांनी सांभाळली आहे. तर, सौरभ चौधरी यांनी कथा आणि पटकथा लिहिली आहे.चित्रपटाचे संवाद प्रथमेश शिवलकर यांचे आहेत. संगीत शंतनु घटक यांचे असून, हे संपूर्ण चित्रपटाच्या गूढतेला आणखी एक रंगत प्रदान करणारे आहे.या चित्रपटात समाविष्ट केलेला आशय आणि त्यातले संवेदनशील विषय प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास पुरेसे असतील.'मंगला' हा चित्रपट हल्ला होणाऱ्या महिलांच्या संघर्षाचे प्रतीक होणार आहे. त्यातून एक सकारात्मक संदेश देण्यात आलेला आहे की, संकटांना सामोरे जाण्याची जिद्द कधीही कमी होऊ देऊ नये..
मंगला या गायिकेचा जीवन प्रवास, तिचा संघर्ष आणि जिद्द दर्शवणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवेल, हे नक्की.'मंगला' १७ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे आणि या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढत चालली आहे. हा एक भयावह आणि प्रभावी कथानक असलेला चित्रपट असल्याने प्रेक्षकांनी नक्कीच त्याला गर्दी करतील, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.