Manava Naik Post Viral: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री मनवा नाईक सोशाल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. नुकतीच तिने तिच्या अकाऊंटवर एक अशी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. मराठी कलाकार नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजातील समस्यांना वाचा फोडताना दिसतात. अनेक कलाकार मंडळी थेट पोस्ट शेअर करून आपया समस्या सोशल मीडियावर मांडतात. मनवा नाईक देखील अशाच कलाकारांपैकी एक आहे. तिने नुकतीच अशी एका पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने मुंबईला सगळ्यात वाईट शहर म्हटलं आहे.
मराठी मनोरंजन विश्वात केवळ अभिनेत्री म्हणूनच नव्हे, तर निर्माती आणि दिग्दर्शिका म्हणून देखील प्रसिद्ध आहे. तिने अभिनयासोबतच अनेक मालिकांच्या निर्मितीची धुरा देखील सांभाळली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या आयुष्यातील अनेक घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र, आता तिने आपल्या नव्या पोस्टमधून मनातील खंत व्यक्त करत मुंबई सध्या वाईट शर बनलंय, असं म्हटलं आहे. तिच्या या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. मनवाची ही पोस्ट सध्याच्या खराब आणि दुषित वातावरणाशी संबंधित आहे.
मनवा नाईक हिने आपल्या या पोस्टमध्ये लिहिले की, ‘हे खरंच खूपच निराशाजनक आहे. वायू प्रदूषण, रस्ते, बांधकाम, रहदारी आणि सौंदर्याच्या दृष्टीने मुंबई आता सर्वात वाईट शहर बनले आहे. धुळीचा थर साचलेले कुरूप ब्लॉक्स इमारतीच्या वरच्या बाजूला साचले आहेत. नवीन पायाभूत सुविधांच्या सबबीखाली वर्षानुवर्षे खोदकाम केले जात आहे. मुंबईची शान असणारे गौरवशाली बँडस्टँड, हाजी अली, आता पूर्वीसारखे राहिले नाहीत. आता रेसकोर्सची वेळ आली आहे. या सगळ्याचं खूप दुःख होतंय.’ या पोस्टच्या शेवटी तिने एक तळटीप देखील लिहिली आहे. यात तिने म्हटले की, ‘या पोस्टचा राजकारणाशी काहीही संबंध नाही.’
मात्र, आता मनवाच्या या पोस्टखाली काही नेटकऱ्यांनी कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘आपल्या माणसाचा प्रॉब्लेम हा आहे की, आपल्या सगळ्यांना रहायला घरं हवी आहेत. त्या घरांमध्ये राहून आपण बाहेर माणसांची घरांची किती गर्दी झाली आहे, याबद्दल रडत असतो. पण हे विसरतो की, आपण सुद्धा त्याच गर्दीचा भाग आहोत आणि त्याच गर्दीत आपलासुद्धा वाटा आहे. माणसासारखा ढोंगी प्राणी नाही.’ आणखी एका व्यक्तीने लिहिले की, ‘बरोबर आहे, पाहिला सकाळचा सूर्योदय खूप छान वाटायचा आणि आता हवेत एवढी धूळ आहे की, वाटतं बाहेर धुकं जमलं आहे की काय... आमच्या इथे तर रात्री ८-९च्या दरम्यान बाजुच्या इमारतीमध्ये बांधकाम सुरू असतं.’
संबंधित बातम्या