मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Manasi Naik: अभिनेत्री मानसी नाईक पुन्हा प्रेमात पडली? नव्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चांना उधाण

Manasi Naik: अभिनेत्री मानसी नाईक पुन्हा प्रेमात पडली? नव्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चांना उधाण

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 24, 2024 10:12 AM IST

Manasi Naik Fell In Love: नुकतीच मानसी नाईकने एक अशी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे ती पुन्हा एकदा प्रेमात पडलीये, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Manasi Naik Fell In Love again
Manasi Naik Fell In Love again

Manasi Naik Fell In Love: ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ या गाण्यामुळे घराघरांत पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक नेहमीच काहीना काही कारणामुळे चर्चेत असते. काहीच महिन्यांपूर्वी मानसी नाईक हिने पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे ती प्रचंड चर्चेत आली होती. दरम्यानच्या काळात मानसी नाईक हिने स्वतःला कामात झोकून दिले होते. या दरम्यान ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाली आहे. नुकतीच तिने एक अशी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे मानसी नाईक पुन्हा एकदा प्रेमात पडलीये, अशी चर्चा सुरू झाली आहे.

अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नुकतेच तिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना तिने जे कॅप्शन दिलेय, त्यावरून सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत. या पोस्टमध्ये तिने स्वत:च्या फोटोंसोबत प्रेमात पडायला हवं असं म्हटलं आहे. या फोटोंमध्ये मानसी नाईक काळ्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. तिने आपले हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबतच तिने स्वतःचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवला आहे. तिच्या कॅप्शनने मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Fighter Advance Booking: रिलीज आधीच बॉक्स ऑफिसवर ‘फायटर’चा धुमाकूळ! अ‍ॅडव्हान्स बुकिंगने कमावले कोट्यवधी

अभिनेत्री मानसी नाईक हिने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती आपली सुंदर साडी फ्लाँट करताना दिसली आहे. या काळ्या साडीने मानसी नाईक हिच्या सौंदर्याला चार चांद लावले आहेत. मानसी नाईकने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलेय की, ‘प्रेम म्हणजे काय हे समजण्यासाठी आधी प्रेमात पडावं लागतं’. तिच्या या कॅप्शनमुळे आता अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेमात पडली की काय?, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. चाहते तिच्या या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून मानसी नाईकवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

‘किती हे सौंदर्य’, ‘आम्ही आधीच तुमच्या प्रेमात पडलोय’, ‘खूप सुंदर’, अशा वेगवेगळ्या कमेंट्स करत चाहते तिला प्रतिक्रिया देत आहे. तर, एका चाहत्याने मानसी नाईक हिला कमेंट करत म्हटलं की, ‘जमतंय का बघ... मी नाही देणार भय्यासारखा धोका, आयुष्यभर साथ देणार’. मानसीचे चाहते तिला पुन्हा एकदा प्रेमात पडून स्वतःचा संसार सुरू करण्याचा सल्ला देत आहेत.

WhatsApp channel