Daily Soap: मालिकेच्या सेटवर शॉक लागून एकाचा मृत्यू
Man Died on shooting Set: फिल्म सीटीमधील मालिकेच्या सेटवर एकाचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.
गोरेगावमधील छोट्या पडद्यावरील मालिकेच्या सेटवर मोठा अपघता झाला आहे. या अपघातात सेटवर काम करणाऱ्या क्रू मेंबरचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव महेंद्र यादव असल्याची माहिती समोर आली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोशिएशनचे अध्यक्ष सुरेश श्याम गुप्ता यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 'गेल्या काही दिवसांपासून महेंद्र या मालिकेच्या सेटवर काम करत होता. अचानक शॉक लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.' सध्या पोलिस या प्रकरणी चौकशी तापास करत आहेत.
वाचा: 'बॉईज ४'मध्ये कोणते कलाकार झलकणार? अखेर समोर आली माहिती
सुरेश गुप्ता यांनी महाराष्ट्र सरकारला महेंद्रच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी केली आहे. 'या प्रकरणी निर्माता आणि प्रोडक्शन हाऊस विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत करण्यात यावी. तसेच फिल्मसिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि कामगार आयुक्त यांचा राजीनामा तात्काळ घेण्याते येणार आहे' असे ते म्हणाले.
कोणत्या मालिकेच्या सेटवर हा अपघात घडला आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
विभाग