‘मन धागा धागा जोडते नवा’मधील अभिषेक रहाळकर अडकला विवाहबंधनात, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘मन धागा धागा जोडते नवा’मधील अभिषेक रहाळकर अडकला विवाहबंधनात, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

‘मन धागा धागा जोडते नवा’मधील अभिषेक रहाळकर अडकला विवाहबंधनात, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 25, 2025 08:08 AM IST

सध्या सोशल मीडियावर ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतील अभिनेता अभिषेक रहाळकरच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. त्याच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Abhishek Rahalkar marriage
Abhishek Rahalkar marriage

सध्या अनेक कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मराठी टीव्ही विश्वातील अभिनेत्री शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे हे बोहल्यावर चढले. तसेच दिव्या पुगावकर, अंकिता वालावलकर लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतील अभिषेक रहाळकर हा नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सोशल मीडियावर फोटोची चर्चा

अभिषेक रहाळकरच्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियावर वणव्यासारखी व्हायरल झाली होती. त्यानंतर लगेच आता त्याच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. अभिषेकने कृतिकाशी लग्न केले आहे. पण त्यांच्या लग्नातील फोटो हे रुमानी खरेने शेअर केले आहेत. तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर करत, “आणि त्यांनी लग्न केलं आहे” असं म्हटलं आहे.

कसा आहे दोघांचा लूक?

या फोटोमध्ये अभिषेक व त्याच्या पत्नीचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे. अभिषेकने ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी व त्यावर डिझायनर फेटा परिधान केला आहे. तर त्याच्या पत्नीने सोनेरी रंगाची साडी परिधान केली असून त्यावर डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे. दोघे या फोटोमध्ये अतिशय आनंदी दिसत आहेत. अभिषेकने त्यांच्या विवाहसोहळा अतिशय खासगी पद्धतीने पार पाडला आहे. त्याने काही मोजक्याच लोकांना लग्नाचे आमंत्रण दिले होते.

अभिषेक रहाळकर सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच त्याच्या लग्नाचा हा फोटो पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. हे फोटो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.
वाचा: राम गोपाल वर्मा यांना ३ महिन्यांचा तुरुंगवास, अजामीनपात्र वॉरंट जारी

अभिनेता अभिषेक रहाळकरने ‘मन धागा धागा जोडते नवा’ लोकप्रिय मालिकेत काम केले होते. स्टार प्रवाहवरील या मालिकेने अल्पावधीच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. या मालिकेतील सार्थक-आनंदीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. काही दिवसांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

Whats_app_banner