स्टार प्रवाहवरील 'मन धागा धागा जोडते' या नवा मालिकेले प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे घर केले आहे. या मालिकेतील सार्थक-आनंदी या जोडीला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. सार्थकचे आनंदीवर जीवापाड प्रेम आहे. आता मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे ज्याची प्रेक्षक गेल्या काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहात होता. चला जाणून घेऊया आजच्या भागात काय घडणार.
आपल्या प्रत्येक कृतीतून आनंदीवरचे प्रेम आणि तिच्याविषयी वाटणारा आदर तो व्यक्त करत असतो. सार्थक सारखा समजून घेणारा आणि चांगल्या-वाईट प्रसंगांमध्ये खंबीरपणे पाठीशी उभा रहाणारा जोडीदार मिळाला तर आयुष्य सुखकर होते याची अनुभूती या मालिकेत पाहायला मिळते आहे. लवकरच संपूर्ण कुटुंबाच्या साक्षीने हे दोघे पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. सार्थक-आनंदीची हळद, मेहंदी, संगीत आणि लग्न हे सगळे विधी अगदी पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहेत.
वाचा: एक दिवस अचानक मालिकेतून काढलं; ‘आई कुठे काय करते’मधील अभिनेत्रीचा खुलासा
आनंदी-सार्थकच्या परिवारासोबतच स्टार प्रवाहच्या कुटुंबातले सदस्यही या विवाहसोहळ्याला हजेरी लावणार आहेत. कला-अद्वैत, जानकी-हृषिकेश, पिंकी-युवराज, नित्या-अधिराज, सायली-अर्जुन या स्टार प्रवाहच्या लोकप्रिय जोड्या 'मन धागा धागा जोडते' मालिकेत दिसणार आहेत. हे सर्व कलाकार हे आनंदी आणि सार्थकला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचणार आहेत.
वाचा: संघर्षयोद्धा ते जुनं फर्निचर, एप्रिल महिन्यात मराठी चित्रपटांची मेजवानी
गेल्या काही दिवसांपासून ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपी यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर दिसत आहे. त्यानंतर मुक्ता आणि सागरची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. त्यांची 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. लक्ष्मीच्या पाऊलांनी आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिका तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या आई कुठे काय करते ही मालिका टीआरपी यादीमधून बाहेर पडली आहे.