Aavesham Review: एका गँगस्टरसोबतची मैत्री! जाणून घ्या काय आहे 'आवेशम' सिनेमाची कथा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aavesham Review: एका गँगस्टरसोबतची मैत्री! जाणून घ्या काय आहे 'आवेशम' सिनेमाची कथा

Aavesham Review: एका गँगस्टरसोबतची मैत्री! जाणून घ्या काय आहे 'आवेशम' सिनेमाची कथा

Aarti Vilas Borade HT Marathi
May 30, 2024 03:56 PM IST

Aavesham Review: अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या 'आवेशम' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार चला जाणून घेऊया...

Aavesham Review:  'आवेशम' सिनेमाची कथा
Aavesham Review: 'आवेशम' सिनेमाची कथा

सध्या सोशल मीडियावर एक रिल व्हायरल होत आहे. या रिलमध्ये अभिनेता फहाद फासिल तीन तरुण मुलांसोबत पार्टीमध्ये डान्स करत असतो. त्यामधील एक मुलगा फहादसोबत सेल्फी काढण्यासाठी मोबाईल बाहेर काढतो. तेवढ्यात त्याच्या आईचा फोन येतो. तो तरुण आईचा फोन कट करतो आणि सेल्फी घेतो. फहाद संपूर्ण पार्टी थांबवतो आणि त्या मुलाला फोनवर बोलण्यास सांगतो. आईचा एक फोन किती महत्त्वाचा असतो हे सांगणारे फहादचे रिल मल्याळम चित्रपट 'आवेशम'मधील एक सीन आहे. हे रिल पाहूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुक निर्माण झाली होती. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होताच सर्वांचे लक्ष वेधले आहे. अनेकांना या चित्रपटात नेमकी काय कथा दाखवण्यात आली आहे याची उत्सुकता लागली आहे. चला जाणून घेऊया..

काय आहे चित्रपटाची कथा?

'आवेशम' चित्रपटाची सुरुवात हे बंगळुरुमधील एका कॉलेजपासून होते. या कॉलेजमध्ये एरॉनॉटिक्स इंजिनिअरिंग शिकण्यासाठी एक नवी बॅच आलेली असते. नवीन बॅच म्हटल्यावर नवी तरुण मुले आली. मत्रा, कॉलेजमध्ये सिनिअर्स पण आलेच. कॉलेजमध्ये अनेकदा नव्या तरुण विद्यार्थांचे जुने विद्यार्थी रॅगिंग करत असतात. या मुलांमधील काही मुले या रॅगिंगपासून वाचण्याचा मार्ग शोधत असतात. सर्वांसमोर होणारा अपमान, सतत सिनिअर्सकडून मार खाणे या सगळ्याला कंटाळून तीन मित्र अजू, बीबी आणि साथंन हे लोकस सपोर्टच्या शोधात असतात. दरम्यान, या तिघांची भेट लोकल गँगस्टर रंगाशी होते. यानंतर तिघांच्या आयुष्यात खरे अॅडवेंचर सुरु होते.
वाचा: तुमच्या डोळ्यातल्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल! 'आम्ही जरांगे' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

चित्रपटाची सुरुवात ही कॉलेज पासून होते. जवळपास १५ ते २० मिनिटे तरुण मुलांचा ड्रामा दाखवण्यात आला आहे. त्यानंतर कुट्टीची एण्ट्री होते आणि एक रंजक ट्रॅक तयार होतो. पण चित्रपटाच्या सुरुवातीचा अर्धा तास हा चित्रपटाच्या मूळ कथेशी संबंधीत नसतो. अर्ध्यातासानंतर फहाद फॉसिलची एण्ट्री होते. त्यानंतर खरी चित्रपटाची कथा सुरु होते. इतका वेळ गेल्यानंतरही चित्रपटाची कथा जराही कंटाळवाणी वाटत नाही.
वाचा: हे निराशाजनक आहे; 'ऑल आइज ऑन रफा' पोस्ट माधुरीने डिलिट करताच नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

अॅक्शन सीन्स

आवेशम चित्रपटाच्या जमेची बाजू म्हणजे त्यातील बॅग्राऊंड संगीत. या संगीताने रंगाची एण्ट्री आणखी खास केली आहे. तसेच दिग्दर्शक जीतू माधवन यांनी योग्य कलाकारांची निवड केल्याचे त्यांच्या अभिनयावरुन दिसते. कलाकरांची एनर्जी पाहण्यासारखी आहे. तसेच प्रत्येकाच्या आयुष्याते आईचे महत्त्व हे दाखवणारा प्रत्येक सीन दिग्दर्शकाने योग्य पद्धतीने शूट केला आहे. त्यासोबतच चित्रपटातील अॅक्शन सीन्स सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात.
वाचा: नारीचा आत्मा काही वेगळ्याच कारणासाठी आला आहे; ‘अल्याड पल्याड'चा थरकाप उडवणारा ट्रेलर प्रदर्शित

अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आवेशम हा मूव्ही प्रदर्शित झाल्यानंतर त्याची खरी चर्चा रंगली. हा चित्रपट ११ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १५५ कोटी रुपयांची कमाई केली. आता ओटीटीवर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Whats_app_banner