सध्या चित्रपटसृष्टीमधील अनेक अभिनेत्री पुढे येऊन कास्टिंग काऊच विषयी बोलताना दिसत आहेत. त्यांना करिअरमध्ये आलेले अनुभव उघडपणे सांगण्यासाठी त्या पुढे आल्या आहेत. आता बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळख असणाऱ्या मल्लिका शेरावतने देखील धक्कादायक अनुभव सांगितला आहे. तिच्याकडे अनेक अभिनेत्यांनी विचित्र मागण्या केल्या होत्या. या मागण्यांना कंटाळून मल्लिकाने इंडस्ट्रीला रामराम ठोकला.
मल्लिका शेरावतने एका मुलाखतीमध्ये खासगी आयुष्यावर वक्तव्य केले होते. ती इंडस्ट्रीमध्ये आलेले वाईट अनुभवांवर प्रकाश टाकला होता. 'मी दुबईमध्ये एका बिग बजेट चित्रपटाचे शुटिंग करत होते. या चित्रपटात अनेक कलाकार दिसणार होते. चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा सुपरहिट ठरला होता. लोकांना आवडला. मी त्या चित्रपटात एक विनोदी भूमिका साकारली होती. या चित्रपटात काम करणारे अभिनेते रात्री १२ वाजता माझ्या रुमचा दरवाजा वाजवायचे. इतक्या जोरात दार धोकायचे की एकदा तर मला वाटले दरवाजा तुटला' असे मल्लिका म्हणाली.
पुढे ती म्हणाली, 'ते माझ्या बेडरुमचा दरवाजा वाजवायचे कारण त्यांना आत घुसायचे होते. मी थेट नाही म्हटले होते. असे होऊ शकत नाही हे स्पष्टच सांगितले होते. त्यानंतर त्या अभिनेत्याने माझ्यासोबत कधीच काम केले नाही.'
मल्लिकाच्या या मुलाखतीनंतर 'वेलकम' या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली. तिने याच चित्रपटात विनोदी भूमिका साकारली होती. त्यामुळे नेटकऱ्यांनी या चित्रपटातील कोणत्या अभिनेत्याने मल्लिकासोबत असे केले असेल असा प्रश्न उपस्थित केला आहे. मल्लिकाने कोणाचेही नाव घेतलेले नाही. पण तरीही नेटकरी चर्चा करताना दिसत आहे.
वाचा: मुंबईतील 'या' शापित बंगल्याने उद्ध्वस्त केले तीन मोठ्या स्टार्सचे करिअर, वाचा कुठे आहे हा बंगला
मल्लिकाचा लवकरच 'विकी और विद्या का वो वाला व्हिडीओ' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटत राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या