बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांनी बुधवारी वांद्रे येथील राहत्या फ्लॅटमधून सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. अनेक कलाकार मलायकाला धीर देण्यासाठी तिच्या घरी पोहोचले होते. पण सध्या एक वेगळी चर्चा सुरु आहे. अनिल मेहता हे मलायका अरोराचे खरे वडील नसल्याचे म्हटले जात आहे. आता नेमकं काय आहे सत्य? चला जाणून घेऊया...
मलायका अरोराने सोशल मीडियावर पोस्ट करत वडील अनिल मेहता यांच्या निधनाची माहिती चाहत्यांना दिली आहे. तिने, 'आम्हाला हे सांगताना खूप दु:ख होत आहे की आमचे लाडके वडील अनिल मेहता आता या जगात नाहीत. ते अतिशय दयाळू व्यक्ती, समर्पित आजोबा, अतिशय प्रेमळ पती आणि आमचे जिवलग मित्र होते. या नुकसानीमुळे आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे, आम्ही प्रसारमाध्यमांना आणि आमच्या हितचिंतकांना विनंती करतो की आम्हाला प्रायव्हसी द्या. आम्हाला समजून घेतल्याबद्दल आणि आमच्या भावनांचा आदर केल्याबद्दल आम्ही आपले आभार मानतो. धन्यवाद' या आशयाची पोस्ट केली.
मलायकाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी मलायाकाच्या वडिलांचे नाव अनिल मेहता आहे मग ती अरोरा आडनाव का लावते? असा प्रश्न उपस्थित केला आहे. एका यूजरने तर 'ही काय भानगड आहे' असा प्रश्न विचारला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल मेहता हे मलायका अरोराचे सावत्र वडील आहेत. मलायकाचे खरे वडील हे अनिल अरोरा आहेत. अनिल अरोरा हे मूळचे पंजाबी हिंदू कुटुंबातील होते. त्यांनी मर्चंट नेव्हीमध्ये काम केले आहे. त्यांचे लग्न जॉयस पॉलीकॉर्प यांच्याशी झाले होते. मात्र, दोघांचा घटस्फोट झाला होता. लग्नानंतर अनिल आणि जॉयस यांना मलायका आणि अमृता अरोरा अशा दोन मुली आहेत. मलायका ११ वर्षांची असताना आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर मलायका आणि अमृता या आईसोबत चेंबूरमध्ये राहू लागल्या होत्या.
वाचा: विकास सेठीच्या पत्नीने शेअर केला अभिनेत्याचा जुना व्हिडिओ, पाहून डोळ्यात येतील अश्रू
अनिल मेहता यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या दोन्ही मुली मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांना शेवटचा फोन केला होता. इंडिया टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अनिल यांनी मलायका आणि अमृताला फोन करून आपली व्यथा मांडली. "मी आता आजारी आणि थकलो आहे" असे ते म्हणाले होते. त्यानंतरच अनिल यांनी आत्महत्या केली.