बॉलिवूडमधील सतत चर्चेत असणारी आणि अतिशय फिट अभिनेत्री म्हणून मलायका अरोरा ओळखली जाते. वयाची ४० ओलांडूनही मलायका तरुण अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते. ती फिटनेसची काळजी घेताना दिसते. जीमला जाताना किंवा योग क्लासला जाताना मलायाकाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर मलायकाचा वर्कआऊट लूक चर्चेत आहे.