बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिने गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियापासून स्वतःला दूर ठेवले होते. अभिनेत्रीचे सावत्र वडील अनिल मेहता यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. यानंतर अभिनेत्री सोशल मीडियापासून दूर गेली होती. मात्र, आता तिने पुन्हा एकदा कमबॅक केले आहे. मलायकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा मलायकाची झलक पाहायला मिळाली आहे. पण, मलायकाने ही पोस्ट स्वत: शेअर केलेली नाही,तर तिच्या हेअरस्टायलिस्टने शेअर केली आहे. त्याने ही पोस्ट मलायकाला टॅग केली आहे. या व्हिडीओमध्ये मलायकाला नवीन हेअरस्टाईलसह एका नव्या लूकमध्ये पाहिल्यानंतर,चाहते देखील खूप आनंदी झाले आहेत.
मलायका अरोराचे हेअरस्टायलिस्ट अमित यशवंत यांनी इंस्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे,ज्यामध्ये मलायका अरोरा खूपच वेगळ्या अंदाजात दिसली होती. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मलायका आरशासमोर बसली आहे,तर तिचा हेअरस्टायलिस्ट तिच्या केसांना परफेक्ट लुक देत आहे. मलायका या व्हिडीओसाठी खूप मस्त एक्सप्रेशन देत आहे. तिची ही स्टाईलने पाहून चाहतेही खूश झाले आहेत.
मलायका अरोरा हिचा हा व्हिडीओ पोस्ट करत अमित यशवंतने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हेअर फॉर मलायका अरोरा.’ मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा मलायकाचा लेटेस्ट व्हिडीओ आहे. नुकतीच मलायका अरोरा तिच्या स्टायलिस्टकडे केस ट्रिमिंगसाठी गेली होती. वडील अनिल मेहता यांच्या निधनानंतर मलायकाला पहिल्यांदा सोशल मीडियावर पाहिल्यानंतर चाहतेही व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत आहेत. इतकंच नाही, तर चाहते मलायकाच्या कमबॅकचं सोशल मीडियावर कौतुक करत आहेत.
दरम्यान,मलायका अरोराने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीच्या'येक नंबर'या मराठी चित्रपटातील आयटम साँगची झलक पाहायला मिळाली आहे. नुकताच या मराठी चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज झाला होता. या व्हिडीओ क्लिपमध्ये मलायका पुन्हा एकदा आपली डान्सिंग स्टाईल दाखवताना दिसली आहे. या चित्रपटातून मलायका मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांचे ११ सप्टेंबर रोजी निधन झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,त्यांनी वांद्रे येथील फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराने भावनिक नोट शेअर करून वडिलांना श्रद्धांजली वाहिली होती. तसेच, चाहत्यांना त्यांच्या प्रायव्हसी आदर करण्याची विनंती केली. तेव्हापासून मलायका सोशल मीडियापासून दूर होती.