नुकताच अभिनेता अरबाज खानने दुसऱ्यांदा निकाह केला. त्याच्या निकाहतील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. अरबाजने मेकअप आर्टिस्ट शौरा खानशी निकाह केला आहे. अरबाजची बहिण अर्पिताच्या घरी त्यांच्या या निकाहचे आयोजन करण्यात आले होते. आता अरबाजची पूर्वाश्रमीची पत्नी मलायका अरोराने दुसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे.
मलायकाला घटस्फोट दिसल्यानंतर आणि जॉर्जिया एंड्रियानीसोबत ब्रेकअप केल्यानंतर ५६ वर्षीय अरबाजने दुसरे लग्न केले. आता मलायका दुसरे लग्न कधी करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मलायकाने 'झलक दिखला जा ११' या कार्यक्रमात दुसऱ्यांदा लग्न करण्यावर वक्तव्य केले आहे. तिच्या या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
वाचा: ही तर तोंडावरच आपटेल; बॉडीकॉन ड्रेसमुळे मलायका झाली ट्रोल
'झलक दिखला जा 11' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये फराह खान मलायकाला विचारते, "२०२४मध्ये तू अभिनेत्री आणि सिंगल पॅरेंट असणार की अभिनेत्री आणि डबल पॅरेंट असणार?" यावर उत्तर देत मलायका म्हणते,"मला पुन्हा कोणालातरी दत्तक घ्यावे लागेल" यावर गौहर खान म्हणते,"तू दुसरे लग्न करणार आहेस का?"
गौहरच्या प्रश्नाचे उत्तर देत मलायका म्हणते,"एखादी चांगली व्यक्ती असेल तर नक्कीच मी १००% लग्न करण्याचा विचार करेल. मला कोणी लग्नसाठी मागणी घातली तर मी पुन्हा संसार थाटेल." मलायकाच्या या वक्तव्यामुळे ती दुसऱ्या लग्नासाठी तयार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सोशल मीडियावर मलायकाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी तिला पाठिंबा दिला आहे.