बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर हे कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. दोघे सतत एकत्र फिरताना, डिनर डेटला जाताना दिसायचे. पण गेल्या काही दिवसांपासून अर्जुन आणि मलायकाचा ब्रेकअप झाल्याच्या अफवा सुरु आहेत. मात्र, यावर मलायका किंवा अर्जुनने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मलायकाला प्रेम आणि सोशल मीडियाशी संबंधीत प्रश्न विचारण्यात आले. त्यावर तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.
मलायकाने हॅलो मॅगझिनला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये सोशल मीडियाविषयी तिला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने, "इंटरनेट ही खूप विषारी जागा आहे. मी माझ्या भोवती ढाल बांधली आहे. त्यामुळे मी नकारात्मकता माझ्याकडे येऊ देत नाही. मी स्वत:ला या सगळ्यापासून खूप लांब ठेवते. मग त्यामध्ये ट्रोलर्स असतील, कामाचा काही भाग असेल, ओळखीची लोक असतील मी सर्वांपासून सोशल मीडियावर लांब राहाते" असे उत्तर दिले.
वाचा: प्रभास आणि दीपिकाचा 'कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट कसा आहे? वाचा रिव्ह्यू
"मला अशी ऊर्जा जिकडे जाणवते तिकडे लगेच मी मागे सरकते. ही गोष्ट मी कलांतराने शिकले आहे. सुरुवातीला माझ्यावर या सगळ्या गोष्टींचा परिणाम व्हायचा. मला कधी कधी झोप लागायची नाही. त्यामुळे जर मी म्हणाले की मला या गोष्टींचा फरक पडत नाही तर ते चुकीचे ठरेल. मी देखील माणूस आहे. त्यामुळे मलाही रडायला येते, दुखावली जाते आणि ट्रोल झाल्यानंतर सर्वांना जसे वाटते तसेच मलाही वाटते" असे मलायका म्हणाली.
वाचा: 'संसदेत गदारोळ झाला होता', शर्मिला टागोर यांच्या बिकिनी फोटोशूटवर पतीची काय होती प्रतिक्रिया?
पुढे मलायकाने सांगितले की सोशल मीडियावर ज्यांची काही नावे नसतात किंवा चेहरे नसतात अशा लोकांना उत्तर देण्याची गरज नाही. माझ्या आयुष्यात ट्रोलर्सला किंमत नाही. मला अनेक गोष्टी जमतात. पण या सगळ्यापासून ती स्वत:ला लांब ठेवते.
वाचा: बॉडीगार्डची 'ती' चूक नागार्जुनने सुधारली, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
या खास संभाषणादरम्यान मलायकाला प्रेमाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ती म्हणाली, तो एक हार्डकोअर रोमँटिक आहे. मी कधीही प्रेमाचा विचार सोडणार नाही. मग काहीही होऊ दे. या सगळ्या गोष्टींमध्ये मी अतिशय टीपिकल आहे. त्यामुळे मी प्रेमासाठी लढणार. परंतु मी खूप वास्तववादी देखील आहे. कुठे थांबायचे हे मला माहिती आहे.