Malaika Arora Social Media Post: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून प्रसिद्धी झोतात येत आहेत. मात्र, अद्याप या दोघांनीही अधिकृतपणे ब्रेकअपबद्दल भाष्य केलेले नाही. अर्जुन कपूरच्या वाढदिवसालाही मलायकाने सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा दिल्या नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलायका आणि अर्जुनचे काही महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाले होते. मात्र, आता मलायकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने कोणत्या लोकांकडे अधिक लक्ष द्यावे हे सांगितले आहे.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर गेल्या खूप वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण, आता दोघे वेगळे झाले आहेत. दोघेही अनेक महिन्यांपासून एकमेकांसोबत बाहेर जाणे देखील टाळत आहेत. ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान दोघेही एकदाही एकत्र दिसले नाहीत.
मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक कोट शेअर केला आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे की, 'नेहमी त्या लोकांकडे लक्ष द्या जे तुमच्या सुखात आनंदी आणि तुमच्या दु:खात दुःखी असतात. अशा लोकांना तुमच्या हृदयात विशेष स्थान मिळायला हवे.’ मलायकाने या पोस्टमध्ये कोणाचाही उल्लेख केलेला नाही. तिच्या आणि अर्जुनच्या ब्रेकअपच्या बातम्या येत असताना तिने ही पोस्ट शेअर केली आहे.
अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीतही मलायका अरोरा दिसली नव्हती. अर्जुनच्या मिडनाईट बर्थडे पार्टीला त्याचे सर्व मित्र उपस्थित होते. पण, यावेळी देखील मलायका तिथे नव्हती. इतकंच नाही तर, तिने सोशल मीडियावर अर्जुनला शुभेच्छा देखील दिल्या नाहीत. अर्जुन आणि मलायकाच्या ब्रेकअपची बातमी तेव्हा समोर आली जेव्हा दोघांनी एका इव्हेंटला हजेरी लावून एकमेकांकडे दुर्लक्ष केले होते. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची पुष्टी केली होती. त्यानंतर दोघेही त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत राहिले. मात्र, आता त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे.
मलायका आणि अर्जुन बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. २०१९मध्ये या दोघांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. दरम्यान, पिंकविलाने काही दिवसांपूर्वी मलायका आणि अर्जुनचे नाते एका वेगळ्या वळणावर आले असल्याचे म्हटले होते. दोघांच्याही हृदयात एकमेकांसाठी खास स्थान असले, तरी या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून, या मुद्द्यावर ते दोघेही चुप्पी साधणार आहेत, असे म्हटले होते.