Malaika Arora With Mystery Man: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बऱ्याच दिवसांपासून ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. सोशल मीडियावर या दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या सातत्याने येत असतात. मलायका आणि अर्जुनने अनेकदा त्यांच्या ब्रेकअपवर आधारित पोस्ट देखील शेअर केल्या आहेत. मात्र, आतापर्यंत दोघांनीही विभक्त होण्याबाबत उघडपणे भाष्य केलेले नाही. दरम्यान मलायका स्पेनमध्ये एका मुलासोबत दिसली. आता हा मिस्ट्री मॅन कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअप चर्चांदरम्यान मलायका स्पेनमधील एका मिस्ट्री मॅनसोबत दिसली. या फोटोंमध्ये ती मिस्ट्री मॅनसोबत स्पेनमध्ये मस्ती करताना दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच खळबळ उडाली. मलायका या मिस्ट्री मॅनला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.
मलायका अरोरा सध्या स्पेनमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. अशातच आता मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्पेनमधील चार फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत मिस्ट्री मॅनने हातात ज्यूसचा ग्लास घेतलेला दिसत आहे. दुसऱ्या फोटोत मलायका निऑन कलरची बिकिनी घालून मजा करत आहे. तर एकामध्ये जेवणाची प्लेट दिसत आहे. पण तिसऱ्या फोटोत एक माणूस उभा असल्याचे दिसत आहे. या माणसाने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. या फोटोमध्ये त्या माणसाचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. सोशल मीडियावर हा फोटो समोर येताच पुन्हा एकदा मलायका प्रेमात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हा माणूस कोण आहे, काय करतो याबाबतची माहिती समोर आलेली नाही.
नुकताच पार पडलेल्या अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नाला संपूर्ण बॉलिवूड पोहोचले होते. मात्र, मलायका अरोरा या लग्नात दिसली नाही. अनंत-राधिकाच्या लग्नात अर्जुन एकटाच पोहोचला होता, तिथे त्याने जोरदार डान्स केला होता. अर्जुनला एकटं पाहून त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या सोशल मीडियावर अधिकच जोर धरू लागल्या आहेत.
वाचा: पावसाळ्यात कपडे वाळवणं ही सुद्धा एक कलाच! कुशल बद्रिकेची मजेशीर पोस्ट व्हायरल
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा आता विभक्त झाले आहेत. पण दोघांनीही यावर कधीच उघडपणे प्रतिक्रिया दिली नाही. पण, हे दोघं बराच काळ एकत्र दिसले नाहीत, त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांवर कुठेतरी शिक्कामोर्तब होताना दिसत आहे.