मराठी बातम्या  /  Entertainment  /  Malaika Arora Share Arjun Kapoor S Bold Photo On Social Media And Gets Trolled

Malaika And Arjun Kapoor: मलायकाने शेअर केला अर्जुन कपूरचा न्यूड फोटो; सोशल मीडियावर होतेय ट्रोल!

Arjun Kapoor And Malaika Arora
Arjun Kapoor And Malaika Arora
Harshada Bhirvandekar • HT Marathi
May 29, 2023 08:52 AM IST

Malaika share Arjun Kapoor photo: नुकताच मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अर्जुनचा असा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे, की ज्यामुळे इंटरनेट विश्वाचा पारा चांगलाच वाढला आहे.

Malaika share Arjun Kapoor photo: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून नेहमीच बॉयफ्रेंड अर्जुन कपूरवर भरभरून प्रेम व्यक्त करताना दिसते. या कपलमधील बॉन्डिंग पाहून त्यांचे चाहते प्रचंड खूश होतात. अर्जुन आणि मलायका हे कपल सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि नेहमीच आपले नवनवे फोटो शेअर करत असते. मात्र, नुकताच मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अर्जुनचा असा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे, की ज्यामुळे इंटरनेट विश्वाचा पारा चांगलाच वाढला आहे. या फोटोमध्ये अर्जुन कपूरने केवळ एका उशीने आपले शरीर झाकले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मलायका अरोराने रविवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर सोफ्यावर बसून आळस देताना दिसत आहे. मात्र, या फोटोमध्ये त्याने कपडे परिधान केलेले नाहीत. तर, केवळ एका लहान उशीने आपले शरीर झाकले आहे. अर्जुन कपूरचा हा फोटो जरी ब्लॅक अँड व्हाईट असला, तरी या फोटोने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवली आहे. अर्जुन कपूरचा टॅटूही या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे. मलायका अरोराने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझा अतिशय आळशी मुलगा'. अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर या पोस्टचा स्क्रीनशॉटही पोस्ट केला आहे.

Arjun Kapoor
Arjun Kapoor

मात्र, मलायका अरोरा हिने हा फोटो शेअर केल्यानंतर आता ती चांगलीच ट्रोल होत आहे. नेटकरी या फोटोवरून मलायकाची खिल्ली उडवताना दिसत आहेत. तर, काहींनी तिला दोघांच्या वयातील अंतर लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. काहींनी मलायकावर वेगवगेळ्या कमेंट्स केल्या आहेत. मात्र, नेहमीप्रमाणेच तिने या सगळ्यांना धुडकावून लावले आहे. अर्जुन आणि मलायका बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मलायका अरोराने अर्जुन कपूरवर प्रेमाचा वर्षाव करण्याची ही पहिलीच वेळ नाही. बी टाऊनची ही जोडी अनेकदा एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसते. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा गेल्या चार वर्षांहून अधिक काळ एकमेकांना डेट करत आहेत.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकाने ती पुन्हा लग्न करण्याचा विचार करत असल्याचा खुलासा केला होता. मलायका म्हणाली की, ‘’नक्कीच मी याचा विचार केला आहे. माझा प्रेमावर विश्वास आहे…पण मी पुन्हा लग्न कधी करणार याचे उत्तर आताच देता येणार नाही. कारण मला काही गोष्टी सरप्राईज ठेवायच्या आहेत…सगळं आधी सांगितलं तर त्यातील आनंद निघून जाईल.’

WhatsApp channel