मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Aarti Vilas Borade HT Marathi
May 17, 2024 09:40 AM IST

अभिनेत्री मलायका अरोराने तिचे मुंबईतील वांद्रे येथील घर भाडे तत्त्वावर दिले आहे. पण या घराचे भाडे ऐकून तुम्ही देखील चकीत..

अभिनेत्री मलायका अरोराचे वांद्रे येथील घर
अभिनेत्री मलायका अरोराचे वांद्रे येथील घर (Instagram)

बॉलिवूडमधील अतिशय हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून मलायका अरोरा ओळखली जाते. वयाच्या ४५ ओलांडल्यानंतरही मलायका तिच्या हॉट अदांनी सर्वांच्या मनावर राज्य केले आहे. आता मलायकाने तिचे मुंबईतील वांद्रे येथील घर भाडे तत्त्वावर दिले आहे. पण या घराचे दर महिन्याचे भाडे ऐकून तुम्ही देखील चकीत व्हाल...

ट्रेंडिंग न्यूज

प्रसिद्ध डिझायनरला दिले भडेतत्त्वार घर

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील पाली हिल्स परिसरात असलेले अपार्टमेंट हे भाडेतत्त्वावर दिले आहे. तिने बॉलिवूडमधील प्रसिद्ध डिझायनर कशीश हन्सला हे घर भाडे तत्त्वावर दिले आहे. या घराचे भाडे पुढच्या तीन वर्षांसाठी १ लाख ५७ हजार रुपये असणार आहे. दरवर्षी या भाड्यामध्ये ५ टक्के वाढ होणार असल्याचे करारामध्ये लिहिण्यात आले आहे.
वाचा: बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावच्या 'श्रीकांत'ची जेमतेम कमाई, सहाव्या दिवशी फक्त इतकी कमाई

दरवर्षी ५ टक्के भाडे वाढणार

मलायकाने येत्या १२ महिन्याचे घराचे भाडे १ लाख ५० हजार रुपये घेतले आहे. पुढच्या वर्षी हे भाडे १ लाख ५७ हजार रुपये होणार आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी हे भाडे १ लाख ६५ हजार रुपये होणार आहे. मलायकाने करारामध्ये हे नमूद केले आहे. २९ एप्रिल रोजी हा करार तयार करण्यात आला होता. या घरासाठी डिझायनरने ४ लाख ५० हजार रुपये डिपॉझिट म्हणून दिले आहेत.
वाचा: गौरव मोरेच्या 'मॅड' अदांवर बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत फिदा! पाहा रोमँटिक व्हिडीओ

झॅपकीने दिलेल्या वृत्तानुसार, मलायका अरोराने याआधी हे घर द जेफ गोल्डनबर्ग स्टुडिओचे मालक जेफ्री गोल्डनबर्ग यांना भाडे तत्त्वावर दिले होते. या घरासाठी त्यांना दरमहा १ लाख २० हजार रुपये मोजावे लागत होते. आता यावेळी मलायकाने भाड्यामध्ये वाढ केली आहे.
वाचा: 'हे नाटक नाही, राखीची प्रकृती अतिशय गंभीर आहे', अत्यंत जवळच्या व्यक्तीने दिली माहिती

यापूर्वी मलायकाने वांद्रे येथील ऑरेट बिल्डिंगमध्ये फ्लॅट खरेदी केला होता. तिने १४ कोटी ५ लाख रुपये भरत या घराचे बुकींग केले होते. पण तिला या घरावर ताबा मिळाला नव्हता. मलायकाने बिल्डर विरोधात कोर्टात धाव घेतली होती. पण त्यांनी या प्रकरण शांतपणे सोडवले. त्यानंतर मलायकाला या बिल्डींगमधील फ्लॅटचा ताबा मिळाला होता. मलायकचा कथित बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने याच बिल्डींगमध्ये १९व्या मजल्यावर असलेला त्याचा फ्लॅट विकला होता. ४ हजार क्वेअर फूट असलेल्या या घराला चांगली किंमत मिळाली होती.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग