Malaika Arora Relationship Status : सध्या सोशल मीडियावर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे.काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमादरम्यान अर्जुन कपूरने जाहीरपणे म्हटले होते की, तो सिंगल आहे. याआधी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. मात्र, अर्जुनच्या या वक्तव्यानंतर त्यांचे नाते तुटल्याचे सगळ्यांसमोर स्पष्ट झाले होते. मात्र, त्यावेळी मलायका अरोराकडून कोणतेही वक्तव्य करण्यात आले नव्हते. पण, आता मलायकाकडून तिच्या रिलेशनशिप स्टेटसवर एक खास पोस्ट समोर आली आहे, ज्यामुळे तिचे चाहते गोंधळून गेले आहेत.
मलायकाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट पुन्हा रीपोस्ट केली आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की, ‘या क्षणी माझी स्थिती’.यामध्ये खाली तीन पर्याय दिले आहेत, जे असे आहेत, ‘इन रिलेशनशिप, सिंगल आणि हिहीही.’पण शेवटचा पर्याय ज्यामध्ये मलायकाने स्थिती हसण्यासारखी असल्याचे म्हटले आहे, त्याच पर्यायावर हायलाइट करण्यात आले आहे. मलायकाने ही पोस्ट रीपोस्ट केली आहे. परंतु, अजूनही तिने ब्रेकअप झालेय तर आता सिंगल आणि पुन्हा मिंगल हे स्पष्ट केलेले नाही.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यातील नातं संपुष्टात आल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. मात्र, दोघांनीही याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती. गेल्या महिन्यात ‘सिंघम अगेन’च्या प्रमोशनदरम्यान या चित्रपटातील स्टार्सनी एका दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती. यादरम्यान अर्जुनसमोर मलायकाच्या नावाने घोषणाबाजी सुरू झाली. त्याला सतत हेच विचारले जात होते की, ‘मलायका अरोरा कुठे आहे?’ त्यानंतर पापाराझींशी बोलताना अर्जुन कपूर म्हणाला होता की, ‘मी आता सिंगल आहे, सगळ्यांनी रीलॅक्स करा.’ त्याच्या या वक्तव्याला अनेकांनी अधिकृत रित्या ब्रेकअपची घोषणा असल्याचे म्हटले आहे.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी २०१८मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. काही काळाने मलायकाने एक फोटो शेअर करून त्यांच्या नात्याची पुष्टी केली होती. पार्ट्या आणि व्हेकेशन्समध्ये दोघेही अनेकदा एकत्र दिसले होते. तथापि, नंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येऊ लागल्या, ज्याची पुष्टी खुद्द अर्जुन कपूरने गेल्या महिन्यात केली होती.
संबंधित बातम्या