मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Malaika Arora: अर्जुनशी लग्न करण्याविषयी थेट बोलली मलायका! म्हणाली ‘आताशी आमचा प्री हनिमून...’
Malaika Arora reaction on wedding
Malaika Arora reaction on wedding

Malaika Arora: अर्जुनशी लग्न करण्याविषयी थेट बोलली मलायका! म्हणाली ‘आताशी आमचा प्री हनिमून...’

19 March 2023, 13:08 ISTHarshada Bhirvandekar

Malaika Arora reaction on wedding: मलायका आणि अर्जुन लग्नाची बातमी कधी देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. यावर आता स्वतः मलायकाने प्रतिक्रिया दिली आहे.

Malaika Arora reaction on wedding: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांना बी-टाऊनची सगळ्यात क्यूट जोडी मानली जाते. त्यांच्या ही जोडी चाहत्यांमध्ये देखील खूप लोकप्रिय आहे. अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर मलायका गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुन कपूरला डेट करत आहे. चाहते आता त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ एक अनेक कलाकार लग्न करत असताना, आता मलायका आणि अर्जुन ही आनंदाची बातमी कधी देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. यावर आता स्वतः मलायकाने प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या वयात १२ वर्षांचा फरक आहे. पण, त्यांच्यातील प्रेम इतके गहिरे आहे की, वयाच्या अंतरानेही त्यांना काहीही फरक पडत नाही. मलायका अर्जुनसोबतच्या नात्याबद्दल अनेकदा स्पष्ट बोलली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकाने पुन्हा एकदा अर्जुन कपूरसोबतच्या लग्नावर वक्तव्य केले आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा म्हणाली की, तिच्या आणि अर्जुनच्या वयात खूप अंतर आहे, पण त्याचा तिला काहीच फरक पडत नाही. प्रेमाला वय नसते. तर, अर्जुनशी लग्न करण्याविषयी बोलताना ती म्हणाला की, आम्ही सध्या प्री-हनीमूनच्या टप्प्यात आहे आणि इतक्यात आम्हाला लग्नाची घाई अजिबात नाही.

एकीकडे मलायका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे, तर दुसरीकडे तिचा शो 'मूव्हिंग इन विथ मलायका' देखील चर्चेत आहे. अभिनेत्री म्हणून मलायकाच्या खऱ्या आयुष्याची एक छोटीशी झलक या शोमध्ये दाखवण्यात आली आहे. या शोच्या सुरुवातीला तिने अरबाज खानसोबत घटस्फोटाबाबतही चर्चा केली होती. अर्जुनला डेट करणाऱ्या मलायका अरोराला या रिलेशनशिपमुळे अनेकांची बोलणी सहन करावी लागली होती. याचा खुलासा स्वतः मलायका अरोराने केला होता.

विभाग