बॉलिवूड अभिनेत्री मलायका आरोरा ही कायमच चर्चेत असते. कधी तिच्या लूकमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. मलायका फिटनेसच्या बाबतीत कायमच सतर्क असते. तिचे सौंदर्य आणि फिटनेस एखाद्या तरुण अभिनेत्रीला लाजवेल असे आहे. सध्या सोशल मीडियावर मलायकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती अतिशय हॉट आणि बोल्ड दिसत आहे. मात्र, या ड्रेसमध्ये तिला चालता येत नसल्याचे पाहून नेटकऱ्यांनी सुनावले आहे.
मलायका ही सध्या झलक दिखला जा ११ या कार्यक्रमात परिक्षक म्हणून काम करत आहे. तिचे सेटवरील व्हिडीओ आणि फोटो कायमच चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. याच सेटवरचा मलायकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिने शाइन असलेला बॉडी कॉन गाऊन घातला आहे. त्यावर तिने केसाचा पोनी बांधला आहे, मोठे कानातले आणि हिल्स घातल्या आहेत. या लूकमध्ये मलायका अतिशय हॉट दिसत आहे. पण तिला चालायला जमत नाहीये.
वाचा: 'श्रीदेवी प्रसन्न', सई आणि सिद्धार्थच्या हटके सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित
मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी मलायकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मलायका अरोरा हिला तिच्या ड्रेसमुळे अजिबातच चालता देखील येत नाहीये. चालताना तिला इतर लोकांची मदत ही घ्यावी लागत आहे. एका यूजरने मलायकाच्या या व्हिडीओवर कमेंट करत, 'असे ड्रेस घालायचे कशाला?' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'ही तर आता तोंडावरच आपटेल' अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका नेटकऱ्याने 'असे ड्रेस घालण्याची काय गरज आहे? जोरात पडल्याशिवाय हिला अजिबात कळणार नाही' असे म्हणत मलायकाला ट्रोल केले आहे.
संबंधित बातम्या