Malaika Arora: मलायका अरोराच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला सलमान खान गैरहजर! नेमकं कारण तरी काय?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Malaika Arora: मलायका अरोराच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला सलमान खान गैरहजर! नेमकं कारण तरी काय?

Malaika Arora: मलायका अरोराच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला सलमान खान गैरहजर! नेमकं कारण तरी काय?

Published Sep 12, 2024 06:20 PM IST

Malaika Arora Father Death: मलायका अरोरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन झाले आहे. मलायका आणि तिच्या आईला भेटण्यासाठी संपूर्ण खान कुटुंब काल घरी आले होते.

Malaika Arora: मलायका अरोराच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला सलमान खान गैरहजर!
Malaika Arora: मलायका अरोराच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला सलमान खान गैरहजर!

Salman Khan Absent On Anil Mehta Funeral: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांचे बुधवारी निधन झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मलायकाच्या वडिलांनी सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. या कठीण काळात मलायकाचे जवळचे मित्र तिला धीर देण्यासाठी पोहोचले. इतकंच नाही तर, खान कुटुंबातील प्रत्येक सदस्य तिला भेटायला घरी पोहोचला होता. अनिल मेहता यांच्या निधनाची बातमी कळताच अरबाज खान सर्वप्रथम त्यांच्या घरी पोहोचला होता. त्यानंतर सोहेलसोबत हेलन आणि सलीम खान देखील मलायकाच्या घरी रवाना झाले होते.  मलायकाच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारांनाही खान कुटुंब हजार होते. मात्र, या सगळ्यात सलमान खान उपस्थित राहू शकला नाही. त्याच्या गैरहजेरीमागचं कारणही आता समोर आलं आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या नव्या इन्स्टाग्राम स्टोरीनुसार, सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘सिकंदर’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रश्मिकाने नुकतेच फुलांचे काही फोटो शेअर करत, ती ‘सिकंदर’च्या सेटवर असल्याचे म्हटले आहे. रश्मिकाची ही सोशल मीडिया पोस्ट पाहून हे लक्षात येतं की, सलमान खानही तिच्यासोबत शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळेच सलमान खान मलायकाच्या घरी पोहोचू शकलेला नाही.  साजिद नाडियादवाला सध्या या आगामी चित्रपटाच्या दोन गाण्यांच्या शूटिंगसाठी युरोपमध्ये ठिकाण शोधत आहे. युरोपमध्ये सलमान खान आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्यावरील रोमँटिक गाणी शूट करायची आहेत. २०२४च्या अखेरीस सलमान आणि रश्मिका दोन्ही गाण्यांच्या शूटिंगसाठी युरोपला जाणार आहेत.

मलायकाच्या वडिलांच्या आत्महत्येनंतर पोलीस व फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी; प्राथमिक चौकशीत काय आढळलं?

अरबाज शूराने घेतली मलायकाची भेट

काल संध्याकाळी अरबाज देखील त्याची पत्नी शूरासोबत मलायकाच्या आला होता. खान कुटुंबाचा असा पाठिंबा पाहून सर्वजण त्यांचे कौतुक करत आहेत. अशावेळी मलायकासोबत अर्जुन कपूरही दिसला होता. काही दिवसांपूर्वी दोघांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली होती. पण, अशा कठीण काळात अर्जुनने मलायकाची पूर्ण काळजी घेतली.

मलायकाने शेअर केली पोस्ट

मलायकाने आपल्या वडिलांच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक नोट शेअर केली होती. यात तिने म्हटले की, ‘आम्हाला हे सांगताना अत्यंत दुःख होत आहे की, आमचे वडील अनिल मेहता यांचे निधन झाले आहे. ते खूप चांगले व्यक्ती, एक समर्पित आजोबा, प्रेमळ पती आणि आमचे जिवलग मित्र होते. आमचे कुटुंब सध्या शॉकमध्ये आहे आणि आम्ही तुम्हाला विनंती करतो की, या कठीण काळात आमच्या गोपनीयतेचा आदर करा.’

Whats_app_banner