Malaika Arora Father Death: वडिलांच्या निधनाची बातमी कळताच मलायका अरोरा तातडीने पुण्याहून मुंबईला परतली आहे. अभिनेत्री नुकतीच तिच्या घरी पोहोचली आहे. यावेळी पापाराझींनी अभिनेत्रीला तिच्या घराबाहेर स्पॉट केले. वडिलांच्या आत्महत्येबद्दल कळताच तिची अवस्था खूप वाईट झाली आहे. मलायका गाडीतून खाली उतरताच मीडियाने ते आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. अभिनेत्रीची अवस्था पाहून सर्वांनाच दुःख झाले आहे. वडिलांच्या निधनाचे वृत्त कळल्यानंतर अभिनेत्रीचे अश्रू थांबत नव्हते आणि ती रडत रडत घरी पोहोचली.
अभिनेत्रीचा लेटेस्ट व्हिडीओही समोर आला आहे. यामध्ये अभिनेत्री कारमधून खाली उतरून घराच्या दिशेने धावताना दिसली आहे. मलायका तोंडावर मास्क लावून चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, आज त्याच्या भावना तिलाही आवरता आलेल्या नाहीत. अभिनेत्री कार मधून उतरून घराच्या दिशेने धावली. यावेळी तिचे अश्रू थांबत नव्हते. व्हिडीओमध्ये अभिनेत्री खूप रडताना दिसत आहे. ती जशी होती त्याच अवस्थेत निघून घरी परतली आहे.
मलायकाच नाही, तर तिची धाकटी बहीण अमृता अरोरा देखील शॉकमध्ये आहे. मलायकानंतर आता अभिनेत्री अमृता अरोराही तिच्या घरी पोहोचली आहे. वडिलांच्या कथित आत्महत्येचे वृत्त समजताच दुसरी मुलगी अमृताही त्यांच्या घरी धावत आली. मीडिया अभिनेत्रीला कव्हर करण्याचा प्रयत्न करत असताना ती चेहरा लपवत घरात आली. अमृताने तिचा चेहरा हाताने झाकून घेतला. यावेळी ती खूप चिंताग्रस्त दिसत होती. अमृतासोबत तिचा भाचा म्हणजेच मलायका अरोराचा मुलगा अरहान खानही पोहोचला आहे.
मलायकाच्या वडिलांबद्दल कळताच अर्जुन कपूर याने देखील तिच्या घरी धाव घेतली. अमृता आणि अरहान येताना पाहून अर्जुन कपूरने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, सध्या दोघेही काही विचार करण्याच्या किंवा समजण्याच्या स्थितीत नसल्याने त्यांनी अर्जुनला पाहिल्यानंतर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अर्जुनच्या चेहऱ्यावरही दुःख स्पष्ट दिसत आहे. यावेळी अरबाज खान आणि सलमान खानचे संपूर्ण कुटुंब मलायकाला धीर देण्यासाठी तिचे घरी पोहोचले आहे.
मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अरबाज खान सर्वात आधी तिथे पोहोचला होता. त्यांच्यानंतर सलीम खान, सोहेल खान, अलविरा आणि सलमान खानची आई सलमाही मलायकाच्या पोहोचल्या. त्यांच्याशिवाय सोफी चौधरीही या कठीण काळात अरोरा कुटुंबासोबत उभी राहिली आहे.