Malaika Arora Father Death: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल अरोरा यांनी बुधवारी सकाळी आत्महत्या केली आहे. ही घटना आज (११ सप्टेंबर) सकाळी ९ वाजता घडली. वांद्रे येथील आशा मैनार इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून अनिल अरोरा यांनी आपले जीवन संपवले आहे. त्यांच्या आत्महत्येमागील कारणे अद्याप समोर आलेली नाहीत. अनिल अरोरा गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे बोलले जात आहे. प्राथमिक तपासात पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. त्यांचा मृतदेह भाभा रुग्णालयात नेण्यात आला आहे.
मलायकाला तिच्या वडिलांच्या निधनाची बातमी मिळाली, तेव्हा ती पुण्यात होती. माहिती मिळताच ती तात्काळ मुंबईला रवाना झाली आहे. मलायकाचा माजी पती अरबाज खान कुटुंबासह घटनास्थळी पोहोचला आहे. अनिल अरोरा यांना जुलैमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षीपासून अनिल अरोरा यांना प्रकृतीच्या त्रासामुळे मुंबईतील रुग्णालयात सतत दाखल करण्यात येत होते. मलायका अनेकदा आई जॉयससोबत हॉस्पिटलमध्ये जाताना दिसली होती. मात्र, त्यांना नक्की काय झाले होते हे समोर आलेले नाही.
अनिल अरोरा हे मूळचे पंजाबी हिंदू कुटुंबातील होते. त्यांनी मर्चंट नेव्हीमध्ये काम केले आहे. त्याचे लग्न जॉयस पॉलीकॉर्प यांच्याशी झाले होते. मात्र, दोघांचा त्याचा घटस्फोट झाला होता. लग्नानंतर अनिल आणि जॉयस यांना मलायका आणि अमृता अरोरा अशा दोन मुली आहेत.
अभिनेत्री मलायका अरोरा केवळ ११ वर्षांची होती, तेव्हापासून तिचे आई-वडील एकमेकांपासून वेगळे राहत होते. मलायकाने एका मुलाखतीत तिच्या आई-वडिलांच्या विभक्त होण्याच्या वेदना शेअर केल्या होत्या. तिने तिच्या एका जुन्या मुलाखतीत म्हटले होते की, वयाच्या ११व्या वर्षी माझ्या आई-वडिलांच्या घटस्फोटाने मला माझ्या आईकडे बघण्याचा एक नवीन दृष्टीकोनातून मिळवून दिला. मलायका म्हणाली की, तिने तिच्या आईला खूप काम करताना पाहिले आहे. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी सर्व काही विसरून सकाळी कसे उठायचे आणि आपल्या कामाला लागायचे, हे आईकडून शिकल्याचे ती नेहमी सांगते. मात्र, अनेकदा सणांच्या निमित्ताने मलायका आणि तिचं संपूर्ण कुटुंब एकत्र दिसायचं.